घरदेश-विदेशआख्ख्य़ा गावाने आधी कोशिंबीर खाल्ली, अन् इंजेक्शन घ्यायला लावली मोठी रांग

आख्ख्य़ा गावाने आधी कोशिंबीर खाल्ली, अन् इंजेक्शन घ्यायला लावली मोठी रांग

Subscribe

मध्य प्रदेशमध्ये दह्याची कोशिंबीर खाल्यानंतर एक विचित्र आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे. 500 लोकांनी कोशिंबीर खाल्यावर दवाखान्यात पळ काढत रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी रांग लावलीये. अतिशय विचित्र अशी घटना मध्यप्रदेशमधील डबरा चांदपुरा या गावात घडली आहे.मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये सामूहिक कार्यकमामध्ये अनेक गावकऱ्यांनी हजेरी लावली तेव्हा भोजनावेळी 700 लोकांनी दह्याची कोशिंबीर खाल्ली आणि गावकऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली

नेमकं काय घडलं-

ज्या म्हशीच्या दुधापासून हे दही तयार करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ही कोशिंबीर बनवण्यात आली होती तिचा दोन दिवसांपूर्वी कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाला. यासह दुर्देवाने तिच्या बछड्याचाही मृत्यू झाला. ही माहिती कळताच गावकऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी अॅंटी रेबिज इंजेक्शन घेण्यासाठी चक्क जिल्हा रुग्णालयात तातडीने पळ काढला यावेळी रुग्णालयात इंजेक्शन घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी देखील जमा झाली होती.

- Advertisement -

एवढ्या मोठ्या संख्येने गावकरी रुग्णालयात जमा झालेले पाहताच डॉक्टरांनी इंजेक्शन देण्यास नकार दिला आणि यावरूनही बराच वादंग झाला. गावामध्ये दहशत पसरली. ज्या म्हशीला कुत्रा चावल्याने जीचा मृत्यू झाला अशा म्हशीचे दुध प्यायालयाने किंवा कींवा कोशिंबीर खाल्ल्याने रेबीजसारखा आजार पसरत नसल्याच डॉक्टरांनीही गावकऱ्यांना सांगितलं त्याना समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यानंतर SDM यांनी समजावल्यानंतर गावकऱ्यांची भीती काहीश्या प्रमाणात कमी झाली.

चांदपूर गावात एका कार्यक्रमाला जेवणात इतर मेजवाणीसह कोशिंबीरचाही बेत होता. कार्यक्रमात तब्बल 700 जणांनी भोजन केलं. कोणालाही सध्या बाधा झाली नाही सर्व काही ठिक होतं.मात्र जेव्हा त्यांना म्हशीबाबत माहिती मिळाली तेव्हा गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आणि अवघ्या काही काळातच गावकऱ्यांची धास्ती वाढली. त्यानंतर 500 हून अधिक गावकरी सिव्हिल रुग्णालयात अॅन्टी रेबीज इंजेक्शन मारण्यासाठी पोहोचले. मात्र डॉक्टरांच्या समजूतीनंतर त्यांच्यामध्ये निर्माण झालेली दहशत मालवली आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – Amarnath Yatra 2022 : अमरनाथ यात्रा 30 जूनपासून होणार सुरु; मात्र ‘या’ अटींचे पालन करणे बंधनकारक

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -