घरताज्या घडामोडीधक्कादायक! लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने अनेकजण झाले भिकारी

धक्कादायक! लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने अनेकजण झाले भिकारी

Subscribe

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकजण देशोधडीला लागले असून नोकरीधंदाच ठप्प झाल्याने काहीजण भिकारी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यात रोजंदारीवर काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंट या संस्थेने फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान लॉकडाऊनमध्ये बेकार झालेल्या व्यक्तींचे आर्थिक सर्वेक्षण केले. त्यात दिल्लीमध्ये जुन्या भिकाऱ्यांच्या तुलनेत फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात नवीन भिकारी वाढल्याचे समोर आले. विशेष म्हणजे यातील बहुतेक नवीन भिकारी हे लॉकडाऊनच्या आधी रोजंदारीवर काम करणारे बांधकाम मजुर, घरकाम करणारे नोकर, रिक्षाचालक, हातगाडी चालवणारे, स्टॉलधारक, कचरा वेचणारे होते. तर काहीजण अर्धवेळ नोकरीत कमी पैसे मिळत असल्याने नाईलाजाने रस्त्यावर भिक मागत होते.
यातील २०, ७१९ हून अधिकजण रोज २०० रुपये भीक कमवत होते. तर काहीजण २०० ते ५०० रुपये रोज भीक कमवत होते. इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंटच्या याच सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने १० शहरांमध्ये भिकाऱ्यांसाठी एक पुनर्वसन योजना विकसित केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -