घरदेश-विदेशदहशतवाद्याची माहिती द्या,सरकारी नोकरी मिळवा

दहशतवाद्याची माहिती द्या,सरकारी नोकरी मिळवा

Subscribe

काश्मिरमधील दहशतवाद कमी व्हावा यासाठी पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने पुढाकार घेतला आहे.दहशतवादी हल्ले होऊ नयेत यासाठी वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टरं जारी केलं आहे.या दहशतवाद्यांबद्दल माहिती पुरविणाऱ्यांना मोठं बक्षिस म्हणून सरकारी नोकरी दिली जाणार आहे.

जम्मू काश्मिरमधील वाढत्या दहशतवादाला आळा घालण्यसाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी नामी शक्कल लढवली आहे. दहशतवाद्याबद्दल ची माहिती अनेकवेळा ही पोलिसांपेक्षाही जास्त स्थानिक नागरिकांना असते. दहशतवाद्यांची माहिती पोलिसांपर्यंत पोहचावी यासाठी ही माहिती पुरवणाऱ्यांना बक्षीस म्हणून सरकारी नोकरी दिली जाणार आहे.

काश्मिरमधील दहशतवाद कमी व्हावा यासाठी पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क झाले आहेत. दहशतवादी हल्ले होऊ नयेत यासाठी वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टरं जारी केलं आहे.

- Advertisement -
terrorist poster
काश्मिर पोलिसांनी जारी केलं दहशतवाद्यांच पोस्टर

या दहशतवाद्यांबद्दल माहिती पुरविणाऱ्यांना मोठं बक्षिस म्हणून सरकारी नोकरी दिली जाणार आहे. किश्ताड पोलिसांनी दहशतवाद्यांचे पोस्टर शहरभर लावली आहेत. यात एकूण सात दहशतवाद्यांचे फोटो आहेत. या दहशतवाद्यांची माहिती अथवा त्यांना मृत पकडून दिल्यास लाखो रूपयांची बक्षिसही देण्याची घोषणाही यात केली आहे. जो व्यक्ती या दहशतवाद्यांची माहिती देईल त्याची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे. असा उल्लेख बॅनरवर आहे.

यात एचएम गटाचा दहशतवादी मोहम्मद अमीन उर्फ जहांगिर,रियाझ अहमद, ओसामा बिन जावेद,मुदस्सिर हुसेन,तालिब हुसेन,जमालदीन आणि जुनेद अक्रम यांनी नावं आहेत. काश्मिरीमध्ये वाढत्या दहशतावादामागे अनेक कारणं आहेत. काश्मिरमधील वाढती बरोजगारी हे त्यामागील मुख्य कारण आहे. या कारणामुळे अनेकवेळा स्थानिकच दहशतवाद्यांना बळी पडतात. अनेकवेळा दहशतवाद्यांना स्थानिक नागरिकांची फूस आहे असंही म्हटलं गेलं. १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ला दरम्यान याचा प्रत्यय आला. पुलवामा येथील महामार्गावर सीआरफीच्या ताफाच्या २५ बस जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांची एक गाडी जवानांच्या बसला धडकली आणि मोठा स्फोट झाला.. कारमधून आत्मघाती हल्ला करणारा जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा एक स्थानिक दहशतवादी होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -