गुंतवणुकदारांचा बँकांमधील पैसा सुरक्षित – आरबीआय

खातेदारकांनी कोणत्याही बँकेत जमा असलेली गुंतवणुकीच्या सुरक्षिततेबद्दल खात्री बाळगावी, असे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे.

rbi

देशातील गुंतवणुकदारांचा येस बँक घोटाळ्यानंतर बँकिंग यंत्रणेवरचा विश्वासच उडाला आहे. अनेकांनी येस बँक घोटाळ्याची धास्ती घेतली आहे. समाज माघ्यमातून वेगवेगळ्या अफवांनाही ऊत आला आहे. याच अफवा रोखण्यासाठी आणि देशातील गुंतवणुकदारांना दिलासा देण्यासाठी खुद्द ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ (आरबीआय) पुढे आली आहे. देशातील सर्व बँकांमधील खातेधारकांचा पैसा अगदी सुरक्षित आहे. आरबीआयची सगळ्या बँकांच्या कारभारावर करडी नजर आहे, असा दिलासा आरबीआयने गुंतवणुकदारांना दिला आहे.

आपल्या बँक खात्यात जमा असलेल्या पैशांबद्दल खातेदारकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. समाज माध्यमात पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे हे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिझर्व्ह बँक सर्व बँकांवर नजर ठेवून आहे. त्यामुळे खातेदारकांनी कोणत्याही बँकेत जमा असलेली गुंतवणुकीच्या सुरक्षिततेबद्दल खात्री बाळगावी, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.


हेही वाचा – YES Bank घोटाळा, राणा कपुर यांना देशाबाहेर प्रवासासाठी मज्जाव, ईडीने रात्री उशिरा केली अटक