घरताज्या घडामोडीकोरोनाने कमावती व्यक्ती गमावलेल्या कुटूंबियांना मोदी सरकार देणार पेंशन

कोरोनाने कमावती व्यक्ती गमावलेल्या कुटूंबियांना मोदी सरकार देणार पेंशन

Subscribe

कोरोनामुळे कुटुंबातील कमवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना मोदी सरकार पेंशन देणार आहे. त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना पेंशन सरासरी दैनंदिन पगाराच्या ९० टक्के इतके दिले जाणार आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी माहिती दिली. पीएमओने सांगितले की, ‘जर कुटुंबातील कर्ता धर्ता म्हणजेच कमवणारा व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्यांच्या नातेवाईकांना पेंशन दिले जाणार आहे. नातेवाईकांना पेंशन व्यतिरिक्त सरकार कोरोना प्रभावित कुटुंबासाठी वाढीव विमा भरपाईचीही खात्री देईल.’ मोदी म्हणाले की, ‘केंद्र सरकार कोरोनाबाधित कुटुंबासोबत उभे आहे आणि त्याच्यासमोर असलेले आर्थिक समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’

याशिवाय केंद्र सरकारने शनिवारी कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेली मुलं १८ वर्षांची झाल्यावर मासिकत भत्ता दिला जाईल आणि २३ वर्षांचे झाल्यावर पीएम केअर्स फंडमधून १० लाख रुपये दिले जातील. त्यांच्यासाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली जाईल. कोरोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या मुलांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत आयुष्मान भारत अंतर्गत ५ लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा दिला जाईल. शिवाय अशा मुलांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी मदत केली जाणार असून याचे व्याज पीएम केअर्स फंडद्वारे दिले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘भारताचे भविष्य मुलं असून आम्ही त्यांच्या संरक्षणासाठी आणि मदतीसाठी सर्व काही करू. त्यांची काळजी घेणे आणि एका उज्ज्वल भविष्याची आशा करणे हे आमचे कर्तव्य आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccination: कोरोना लसीच्या पुरवठ्याचे कॅग ऑडिट करा – पी. चिदंबरम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -