घरदेश-विदेशसीआरपीएफ जवान झाले जखमीसाठी रुग्णवाहिका

सीआरपीएफ जवान झाले जखमीसाठी रुग्णवाहिका

Subscribe

छत्तीसगडच्या बीजापूरम जिल्ह्यामध्ये कोब्रा बटालियनच्या जवानांनी जनतेसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या जवानांनी मृत्यूची झुंज देणाऱ्या एका व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. कडक उन्हाचा विचार न करता हे जवान या व्यक्तीची अॅम्ब्युलन्स बनत त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. बिजापूरमधील अति दुर्गम भागाममध्ये जखमी झालेल्या एका व्यक्तीला खाटेवर ठेवून खांद्यावरुन तब्बल ५ किलोमीटर असलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्याला उपचासाठी दाखल केले. त्यामुळे या व्यक्तिचे प्राण वाचले. सध्या जखमी व्यक्तिवर बिजापूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisement -

बिजापूर जिल्ह्याच्या तररेम गावातील कोबरा बटालियनचे कमांडर प्रेम कुमारने सांगितले की, शुक्रवारी उपकमांडकर कामेश्वर साहूच्या नेतृत्वाखाली बासागुड पोलीस स्टेशन हद्दीतील बुडगीचेरु भागामध्ये कोबरा बटालियनची टीम गस्तीसाठी निघाली होती. गस्ती दरम्यान एक जवान बुडगीचेरु गावातून जात असताना एका घरामध्ये लोकं जमा झालेली दिसली. त्यांनी विचारपूस केली असता कळाले की एक व्यक्ती ट्रॅक्टरमधून पडल्यामुळे गंभीर जखमी झाला होता आणि त्याची मृत्यूशी झुंज सुरु होती.

वेदनेने विव्हळणाऱ्या व्यक्तिला पाहून जवानांनी त्याला मदत करण्याचे ठरवले. त्यांनी गाववाल्यांची परवानगी घेत या व्यक्तीला मदत करण्यास सुरुवात केली. जखमी झालेल्या व्यक्तीला खाटेवर ठेवले त्यानंतर अनुराग डांगी, अयान, विकास तुषावर, रितेश कुमार, दुर्गा प्रसाद आणि अनिल कुमार या जवानांनी खाटेला खांद्यावर घेऊन हॉस्पिटलकडे निघाले. कडक उन्हामध्ये या जवानांनी ५ किलोमीटरचे अंतर घनदाट जंगलातून पार करत त्यांच्या तररेम कॅम्पवर घेऊन गेले. त्याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन नंतर बीजापूर वरुन संजीवनी अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना बिजापूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता चांगली आहे. जवानांनी केलेल्या या कार्याचे कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -