वंदे मातरम् गीताला राष्ट्रगीतासारखा दर्जा द्या, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

वंदे मातरम् गीताला राष्ट्रगीतासारखा दर्जा द्या, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
दिल्ली उच्च न्यायालय

वंदे मातरम् गीताला भारतीय राष्ट्रगीतासारखा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. याबाबत एक याचिका न्यायालयात दाखर करण्यात आली आहे. वकील आणि भाजपा नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. या याचिकेबाबत भूमिका मांडण्यासाठी सरकारला सहा आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या याचिकेवर ९ नोव्हेंबर २०२२ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

हेही वाचा – हिंदू-मुस्लिम बंधुभाव संपवून आपला अजेंडा चालवण्याचा त्यांचा हेतू, पवारांचे ज्ञानवापी मशीद प्रकरणावर मोठं विधान

वंदे मातरम् गीताचा आदर करणे सर्वांचेच कर्तव्य –

याचिकाकर्ते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी वंदे मातरम् गीताला राष्ट्रगीतासारखाच दर्जा देण्यात यावा अशी जनहित याचिका न्यायालयात दाखल केली आहे.भारत देश एक संघराज्य आहे. देशात सर्वांचे राष्ट्रीयत्व एकच आहे. त्यामुळे वंदे मातरम् या गीताचा आदर करणे हे सर्वांचेच कर्तव्य असून देशाला एकसंध ठेवण्यासाठी जन गण मन आणि वंदे मातरम् या गीताचा प्रसार आणि प्रचार करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. हे दोन्ही गीते संविधान निर्मात्यांनी ठरविलेली आहेत. या गीतामुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचे कारण नाही, असे अश्विनी कुमार उपाध्याय यांनी याचिकेत म्हटले आहे.

हेही वाचा –  ज्ञानवापी मशीद प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाकडे वर्ग, नव्या याचिकेवर होणार सुनावणी

वंदे मातरम् गीतात राष्ट्राचे चारित्र्य –

जन गण मन या राष्ट्रगीतामध्ये देशाला समोर ठेवून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. तर वंदे मातरम् गीतात राष्ट्राचे चारित्र्य आणि विशेषता याबद्दल सांगण्यात आले आहे. त्यामुळे वंदे मातरम् गीतालादेखील समान सन्मान मिळायला हवा. काही वेळा अनुमती नसलेल्या परिस्थितीत वंदे मातरम् हे गीत गायले जाते. या गीताचा आदर राखने हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे ही याचिकेत म्हंटले आहे.