Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भारतातील 5G नेटवर्क टेस्टिंगवर बंदी घाला, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

भारतातील 5G नेटवर्क टेस्टिंगवर बंदी घाला, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

टेस्टिंगमुळे नागरिकांसाठी धोकादायक अजारांना समोरे जावे लागणार

Related Story

- Advertisement -

जगात सर्वच देशात 5G इंटरनेट चाचणी करण्यात येत आहे. या 5G चाचणीमुळे अनेक देशांत नागरिकांना मानसिक आणि नैसर्गिक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. यामुळे अनेक देशातही 5G टेस्टिंगवर विरोध दर्शवला आहे. भारतातही 5G इंटनरेनट टॉवर उभारुन चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्यांवर बंदी घालण्याची मागणी भारतातू होत आहे. या चाचणीला बंदी घालण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते वकील ए.पी. सिंह यांनी 5Gजी टेस्टिंगविरोधात याचिका दाखल केली आहे. या टेस्टिंगमुळे नागरिकांसाठी धोकादायक अजारांना समोरे जावे लागणार असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

वकील ए.पी.सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, 5G टेस्टिंग नागरिकांसाठी धाकादायक आहे. हेग शहरात 5G नेटवर्कची चाचणी करण्यात आली होती त्यावेळी जवळपास ३०० पक्षी आपल्या जीवाला मुकले होते. तर नेदरलँडमध्ये करण्यात आलेल्या चाचणीमध्ये १०० ते १५० पक्षांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच तेथील नागरिका आणि लहान मुलांमध्ये आजारांचे लक्षणे आढळली होती. या नेटवर्कमुळे आपल्या गोपनियतेवर मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होईल. गोपनिय माहिती आणि आपला डेटा चोरिला जाण्याची शक्यता आहे. या 5G नेटवर्क मॅग्नेटिक रेडिएशनचा वापर करुन चालवण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक रेडिएशनमुळे नागरिकांमध्ये कॅन्सर, गर्भावस्थेत असणाऱ्या महिला आणि मुलांच्यावर वाईट परिणाम होईल. दहशतवाद्यांना माहिती चोरण्यासही या नेटवर्कची मदत होणार असल्याचे याचिकाकर्ते ए.पी. सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे.

- Advertisement -

त्यामुळे 5G नेटवर्क टेस्टिंग आपल्या देशात करण्यापासून थांबवावे अशी मागणी होत आहे. 5G विरोधात अनेक देशांनी आंदोलने केली आहेत. अमेरिकेतही 5Gनेटवर्कच्या विरोधात काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले. यामध्ये लहान मुलांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर विरोध दर्शवण्यात आला आहे. भारतात सर्वच टेलिकॉम कंपन्या 5G नेटवर्क उभारण्याबाबत चाचण्या करत आहेत. जिओने घोषणाही केली असून स्वदेशी 5G तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला जात आहे.

- Advertisement -