घरताज्या घडामोडीPetrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा भडका; मुंबई, नांदेडमध्ये पेट्रोल शंभरीपार

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा भडका; मुंबई, नांदेडमध्ये पेट्रोल शंभरीपार

Subscribe

एक दिवस सर्वसामान्यांना दिलासा दिल्यानंतर सरकार तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) किंमतीत आज पुन्हा वाढ केली आहे. आज, सोमवारी पेट्रोलची किंमत (Petrol Price Today) २९ पैसे प्रति लीटर, तर डिझेलची किंमत (Diesel Price Today) ३० पैसे प्रति लीटरने वाढवली आहे. शिवाय इंटरनॅशनल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या मागणीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा भडका झाला आहे. इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.४१ रुपये प्रति लीटर, तर डिझेल ८७.२८ रुपये प्रति लीटर झाले आहे. मुंबई, नांदेडमध्ये पेट्रोलची किंमती शंभरी पार झाली आहे. मुंबईत १०२.५८ रुपये पेट्रोल झाले असून नांदेडमध्ये १०४.८७ रुपये पेट्रोलची किंमत झाली आहे.

४ मेपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढल्यानंतर रेकॉर्ड स्तरावर पोहोचली आहे. आता पेट्रोल २५ दिवसांत ६.०९ रुपये प्रति लीटरने वाढले आहे. तर डिझेल २५ दिवसांत ६.३० रुपये प्रति लीटरने महागले आहे.

- Advertisement -

कोणकोणत्या शहरात पेट्रोल-डिझेलची किंमत काय आहे?

इंडियन ऑईल (Indian Oil) वेबसाईटनुसार, राजधानी दिल्लीमध्ये आज एक लीटर पेट्रोलची किंमत (Petrol Price today in Delhi) ९६.४१ रुपये आणि डिझेलची किंमत ८७.२८ रुपये झाली आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल (Petrol price in Mumbai) १०२.५८ रुपये आणि डिझेल ९४.७० रुपये, कोलकातामध्ये पेट्रोल ९६.३४ रुपये आणि डिझेल ९०.१२ रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत (Petrol Diesel Price Today) ९७.६९ रुपये आणि डिझेल ९१.९२ रुपये झाले आहे. नांदेड जिल्ह्यात पेट्रोल प्रति लीटर १०४.८७ पैसे झाले आहे. महिन्याभरात नांदेड जिल्ह्यात ७.८७ पैसे, डिझेल ५ रुपये ४७ पैशांनी महागले आहे.

‘या’ शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार

हैदराबाद, मुंबई, नांदेड, जयपुर, भोपाळ, श्रीगंगा नगर आणि रीवामध्ये पेट्रोलची किंमती १०० पर्यंत पोहोचली आहे. येथे पेट्रोलचा दर ३ डिजिटपर्यंत पोहोचला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus India Update: दिलासादायक! देशात ९ लाखांहून अधिक रुग्ण सक्रिय; ७२ दिवसांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक घट


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -