घरदेश-विदेशPetrol-Diesel Price: दोन दिवसांनंतर पुन्हा इंधन दरवाढ; जाणून घ्या आजचे दर...

Petrol-Diesel Price: दोन दिवसांनंतर पुन्हा इंधन दरवाढ; जाणून घ्या आजचे दर…

Subscribe

जाणून घ्या. तुमच्या शहरातील दर

गेल्या दहा ते बारा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढीचा सर्वसामान्यांना फटका बसला होता. मात्र या दिवसानंतर गेले दोन दिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नसून ते दर स्थिर होते. परंतु दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. देशभरात पेट्रोलचे भाव ३५ पैशांनी तर डिझेलचे भाव ३८ पैशांनी वाढवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही पेट्रोलिअम कंपन्यांनी वाढ केली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इंधनाच्या दर वाढीमुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा फटका बसणार आहे.

गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती चांगल्याच वाढल्या होत्या. दररोज २५ ते ३० पैशांची वाढ झाल्याने पेट्रोलचे दर हे शंभरीच्या घरात पोहोचले होते. रविवारी आणि सोमवारी या इंधनाच्या दरात थोडी स्थिरता असल्याने ग्राहकांना दिलासा होता. मात्र, आज पुन्हा पेट्रोल, डिझेलची दरवाढ झाल्याचे दिसतेय. दरम्यान, तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. त्यानुसार गेल्या १२ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

- Advertisement -

या ठिकाणी इंधनाने गाठली शंभरी

राजस्थानमधील श्रीगंगानगर, हनुमागड ते मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये किरकोळ पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांच्यावर गेले आहेत. आज मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ९० रूपये ९३ पैशांवर पोहोचले तर मुंबईत हे दर ९७ रूपये ३४ पैशांवर पोहोचले आहेत.

जाणून घ्या. तुमच्या शहरातील दर

पेट्रोलचे दर                                              डिझेलचे दर

- Advertisement -
  • नवी दिल्ली : 90.93 रुपये प्रति लिटर        81.32 रुपये प्रति लिटर
  • मुंबई : 97.34 रुपये प्रति लिटर               88.44 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता : 91.1 2रुपये प्रति लिटर         84.20 रुपये प्रति लिटर
  • चेन्नई : 92. 90 रुपये प्रति लिटर              86.31 रुपये प्रति लिटर
  • नोएडा : 89.19 रुपये प्रति लिटर              81.76 रुपये प्रति लिटर

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -