घरताज्या घडामोडीPetrol Diesal Price: आजही पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesal Price: आजही पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

पाच राज्यांच्या निवडणूका झाल्यानंतर देशातील पेट्रोल डिझेलचे दर वाढायला सुरुवात

पेट्रोल डिझेलच्या दरात आजही वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या राज्यात पेट्रोल डिझेलची मागणी कमी झाली असली तरी पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहेत. मागणी कमी असली तरी किंमत वाढतच आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढलेल्या पहायला मिळत आहेत. पाच राज्यांच्या निवडणूका झाल्यानंतर देशातील पेट्रोल डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली. पेट्रोल डिझेल कंपन्यांनी सलग चार दिवस पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारापेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्याने कंपनी मार्केटिक मार्जिन व्यवस्थित करण्याकडे लक्ष देत आहे. त्यामुळे देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. जाणून घ्या मुंबईसह इतर राज्यातील आजचे इंधन दर.


आज मुंबईत पेट्रोलचे दर ९७.८६ रुपये इतके आहेत. तर डिझेलचे दर ८९.१७ टक्के इतके आहेत. दिल्लीतही पेट्रोलच्या किंमतीत राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे दर ९१.५३ रुपये इतके आहेत. तर डिझेलचे दर ८२.०६ रुपये आहेत. कोलकत्तामध्ये पेट्रोलचे दर ९१.६६ रुपये तर डिझेलचे दर ८४.९० रुपये आहेत. त्याचप्रमाणे चेन्नईमध्येही इंधन दरवाढ करण्यात आली आहे. चेन्नईत आज पेट्रोलचे दर ९३.६० रुपये आहेत. तर डिझेलचे दर हे ८६.९६ रुपये इतके आहेत.

- Advertisement -

मे महिन्यात पेट्रोल डिझेलच्या किंमती चार वेळा वाढल्या होता. आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची पाचवी वेळ आहे. तर मार्च महिन्यात पेट्रोल डिझेलचे दर तीन वेळा कमी झाले होते. तर एप्रिलमध्ये केवळ एकदाच पेट्रोलचे दर कमी झाले होते. जानेवारी माहिन्यात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दहापटीने वाढ करण्यात आली होती. तर फेब्रुवारी महिन्यात १६ पट वाढ करण्यात आली होती. यावेळी पेट्रोल दर ७.७९ रुपयांनी वाढले आहेत. १ जानेवारी रोजी पेट्रोलचे दर ८३.५३ इतके होते. आज हेच दर ९७.८६ रुपये झाले आहेत.


हेही वाचा – आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केली होम क्वारंटाईन रुग्णांसाठी नियमावली

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -