घरताज्या घडामोडीPetrol Diesel Price: सलग 21व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

Petrol Diesel Price: सलग 21व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर आहेत. याआधी यापूर्वी देशात 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

मागील अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर आहेत. याआधी यापूर्वी देशात 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दरम्यान, या इंधनाच्या किमती स्थिर असल्यातरी सर्वसामान्यांच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जारी केलेल्या नव्या दरांनुसार, देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरनं विकलं जातं आहे.

- Advertisement -

पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं.

अंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल आज प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आलं आहे. नायमॅक्स क्रूड प्रति बॅरल 98.98 डॉलवर व्यापार करत आहे, तर प्रति बॅरल 0.44 डॉलरची घसरण झाली आहे. तर, ब्रेंट क्रूड अजूनही प्रति बॅरल 102.44 डॉलरवर व्यापार करत आहे, तर 0.67 डॉलरची घसरण झाली आहे.

- Advertisement -

आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर ‘असे’ तपासा

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.


हेही वाचा – मनसेच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -