घरदेश-विदेशविधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल डिझेलचे वाढले भाव!

विधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल डिझेलचे वाढले भाव!

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोलच्या किंमतीत १४ पैशांनी वाढ झाली आहेत. तर राजधानीत पेट्रोलची किंमत आता प्रतिलिटर ९०.७६ रुपयांवर गेली आहे. यासोबत डिझेलची किंमत १७ पैशांनी वाढून ८३. ७८ रुपये प्रति लिटर झाली आहे. बंगालमध्ये २९ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. या सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर या निवडणुकांचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला. बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल कॉंग्रेस हा पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेत आला.

५ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस लवकरच सरकार स्थापन करणार असून याबाबत तृणमूल काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवडल्या गेल्या असून येत्या ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यासंदर्भातील माहिती तृणमूलचे जेष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांनी दिली.

- Advertisement -

ममता दीदी सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. ममता बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून बुधवारी ५ मे रोजी राजभवनात त्यांचा शपथविधी होणार आहे. तसेच ६ मे रोजी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बिमान बॅनर्जी हे सर्व पक्षाच्या आमदारांना शपथ देतील. त्याचबरोबर बिमान बॅनर्जी यांचीच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे ममता यांचे सरकार सत्तेत येत असताना त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आताच सर्व विरोधकांनी एकजूट करायला हवी, असे आवाहन केले आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -