घरदेश-विदेशपेट्रोल-डिझेल दरवाढीची स्पर्धा सुरूच

पेट्रोल-डिझेल दरवाढीची स्पर्धा सुरूच

Subscribe

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरुच आहे. ३२ व्या दिवशी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना याचा सर्वाधिक फटका बसताना पहायला मिळत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची स्पर्धा गेल्या महिनाभरापासून सुरुच आहे. आज ३२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर उसंडी मारत चालले आहेत. तर दुसरीकडे या दरवाढीमुळे सर्व सामान्य जनतेला त्रस्त झाली आहे.. पेट्रोल डिझेलच्या दराने गेल्या चार दिवसांपूर्वी नव्वदी ओलांडून शंभरीकडे वाचलाच सुरु केली आहे. आज पुन्हा ही दरवाढ झाल्यामुळे मुंबईत पेट्रोलमध्ये २२ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ९०.५७ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. तर डिझेलच्या दरात १८ पैशांनी वाढ झाल्याने डिझेल ७९.०१ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. महिना ओलांडला तरी ही दरवाढ सुरु आहे यावर सरकार काहीच करत नसल्याने जनता नाराज झाली आहे.

- Advertisement -

राजधानीतही पेट्रोल-डिझेलच्या दर वाढले

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराने ९० चा आकडा ओलांडला तर दिल्लीत ही तिच परिस्थिती पहायला मिळत आहे. दर वाढीचे सत्र असेच चालत राहिले आहे. राजधानीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये २२ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल ८३.२२ रुपये प्रतीलिटर तर डिझेलच्या दरामध्ये १८ पैशांनी वाढ झाल्यामुळे पेट्रोल ७४.४२ रुपये प्रतीलिटर दराने मिळत आहे. इंधनाच्या दरामध्ये होणाऱ्या वाढीमुळे जनता हैराण झाली आहे. या दर वाढीमुळे इतर वस्तूंच्या किंमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या खिशाला आणखी फटका बसत आहे. या दरवाढीतून सुटका कधी होणार असा सवाल जनतेकडून केला जात आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात आहे ही परिस्थिती

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे. तर मुंबईमध्ये जरी पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. पण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये पेट्रोलच्या दराने ९२ च्या आकड्याकडे वाटचाल सुरु केली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, उस्मानाबादमध्ये पट्रोलच्या दराने ९१ कडून ९२ कडे वाटचाल सुरु केली आहे. तर परऊणी आणि नांदेडमध्ये पेट्रोलची ९२ कडून ९३ कडे वाटचाल सुरु केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रा आणि कोकणामध्ये पेट्रोलने काही ठिकाणी ९० पेक्षा जास्त तर काही ठिकाणी ९१ पेक्षा जास्त रुपये दराने मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -