Petrol Diesel Price: सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं

अनेक दिवसांपासून इंधनाच्या किंमती वाढत आहेत. मागील ८ दिवसात सातव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोलच्या दरांत ८४ पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत ७४ पैशांची वाढ झाली आहे. इंधनाच्या सततच्या वाढत्या दरांमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

Maharashtra government issues notification to cut VAT on CNG; fuel to be cheaper from Apr 1

अनेक दिवसांपासून इंधनाच्या किंमती वाढत आहेत. मागील ८ दिवसात सातव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोलच्या दरांत ८४ पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत ७४ पैशांची वाढ झाली आहे. इंधनाच्या सततच्या वाढत्या दरांमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी (IOCL) मंगळवार २९ मार्च रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर ८४ पैशांची तर डिझेलच्या दरांत ७४ पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल १००.२१ रुपये आणि डिझेल ९१.४७ रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या ७ दिवसांत तेलाच्या किमतीत झालेली ही सहावी वाढ आहे.

नव्या दरांनुसार, कोलकात्यात पेट्रोलचा दर १०८.०१ रुपये प्रति लिटरवरून १०८.५३ रुपयांवर पोहोचले आहेत. तर कोलकात्यात डिझेल ९३.५७ रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. चेन्नईत पेट्रोल १०४.४३ रुपये प्रति लिटरवरून १०४.९० रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल ९५ रुपये प्रति लिटरनं मिळत आहे.

तेल कंपन्यांनी २२ मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणं सुरूच ठेवलं आहे. अशाप्रकारे ७ दिवसांत पेट्रोल ४.४० रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल ४.५५ रुपयांनी महागलं आहे.

असे पाहा पेट्रोल आणि डिझेलचे दर

IndianOil ONE Mobile App या अॅपवर इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. शिवाय https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx या इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीनं पाहता येईल. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.


हेही वाचा – UP: योगींच्या मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप, ब्रजेश पाठक बनले आरोग्यमंत्री, जितीन प्रसाद यांना PWD, पाहा संपूर्ण यादी