Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Petrol-Diesel Price: ६३ वेळा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती; केंद्राची करातून ३ लाख कोटींची...

Petrol-Diesel Price: ६३ वेळा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती; केंद्राची करातून ३ लाख कोटींची कमाई

Related Story

- Advertisement -

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. दिल्ली आणि मुंबईसह देशातील अनेक बड्या शहरांमध्ये पेट्रोलची किंमत शंभरी पार गेली आहे. सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमती संदर्भात देशातील संसदेत अशाच काही बाबी सरकारने सादर केल्या ज्या जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

६३ वेळा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

लोकसभेत पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या लेखी उत्तरानुसार यावर्षी आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत ६३ वाढ करण्यात आली आहे, तर किंमत केवळ चार वेळा कमी करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ९ जुलै या कालावधीत सरकारने हा आकडा सादर केला आहे. पेट्रोलबद्दल बोलायचं झालं तर गेले १२३ दिवस किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

डिझेलच्या किंमतीत ६१ दिवस वाढ

- Advertisement -

डिझेलच्या किंमती ६१ दिवस वाढवण्यात आल्या. तर फक्त ४ दिवस फक्त किंमत कमी करण्यात आली. गेल्या तीन वर्षांबद्दल जर बोलायचं झालं तर पेट्रोलच्या किंमती २०१८-१९ काळात १४८ वेळा, २०१९-२० मध्ये ८९ वेळा आणि २०२०-२१ मध्ये ७६ वेळा वाढविण्यात आल्या. त्याचप्रमाणे २०१८-१९ मध्ये डिझेलचे दर १४० वेळा, २०१९-२० मध्ये ७९ वेळा आणि २०२०-२१ दरम्यान ७३ वेळा वाढविण्यात आले.

एक्साईज करातून बंपर कमाई

आणखी एक धक्कादायक माहिती केंद्र सरकारच्या पेट्रोलियम उत्पादनांवर, विशेषत: पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या उत्पादन शुल्काच्या उत्पन्नाशी संबंधित समोर आली आहे. जर आपण मागील तीन वर्षात सरकारच्या मिळकतीची तुलना केली तर (२०२०-२१) मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. २०१८-१९ मध्ये सरकारने उत्पादन शुल्कातून २,३५,३०१ कोटी रुपये कमावले, त्यापैकी सुमारे २,१३,००० कोटी रुपये फक्त पेट्रोल आणि डिझेलवरील करातून आले. त्याचबरोबर २०१९-२० मध्ये १,९७,८४५ कोटी रुपये उत्पन्न मिळालं. २०२०-२१ मध्ये सरकारच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झाली. ३,४४,७४६ कोटी एवढं उत्पन्न होतं. यात सुमारे ३,३४,००० कोटी रुपये पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कातून आले.

- Advertisement -

 

- Advertisement -