इंधन २० रुपयांनी स्वस्त होणार; पेट्रोलमध्ये आता इतके टक्के मिसळणार इथेनॉल

नोव्हेंबर २०२२पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट सरकारने ठेवले होते. ते वेळेआधीच पूर्ण झाले आहे.

ethanol petrol mixing

गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेलच्या (Rates of Petrol and Diesel) किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. या वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही वाढल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या दरवाढीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, यातून लवकरच दिलासा मिळणार असल्याचं चिन्ह आहे. कारण, भारताने पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्यात मोठं यश संपादन केलं आहे. नोव्हेंबर २०२२पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट सरकारने ठेवले होते. ते वेळेआधीच पूर्ण झाले आहे. आता २०२५पर्यंत हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीला आळा घालण्यास मदत होणार आहे. (Petrol-Diesel Price : India Has Achieved Target For Ethanol Blending 5 Months Before Deadline)

पर्यावरण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली की, भारताने निर्धारित वेळेच्या ५ महिने आधीच पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य गाठले आहे. २०१४ मध्ये भारतात फक्त १.५ टक्के इथेनॉल मिश्रण केले जायचे. इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण केल्याने तीन फायदे मिळतात. याद्वारे सुमारे २७ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होते. दुसरे म्हणजे, भारताने ४१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन वाचवले आहे. तिसरा फायदा म्हणजे इथेनॉल मिश्रणामुळे जदेशातील शेतकऱ्यांनी ८ वर्षांत ६०० कोटी रुपये कमावले आहेत.

हेही वाचा – थोरात कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पातून पहिला टँकर रवाना!

इथेनॉलवर चालणारी वाहने लवकरच सुरू होऊ शकतात, अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. त्याच अनुषंगाने सरकार आणि कंपन्यांच्या पातळीवर चर्चा पुढे सुरू झाली आहे.

इथेनॉलचे मिश्रण वाढल्यामुळे महागडे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासापासून सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक लिटर इंधनामुळे सुमारे २० रुपयांची बचत होते. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल २० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – राज्यात आता इथेनॉल निर्माण केलं पाहिजे अन् साखर कारखान्यांनी पेट्रोल पंप सुरू करावा – गडकरी

सध्या देशात ४५० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होते. इथेनॉलनिर्मितीमध्ये भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो. अमेरिका, ब्राझील, युरोपीय महासंघ आणि चीनमध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते. तर, भारत आणि ब्राझीलमध्ये इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी केला जातो.