Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Petrol Diesel Price: पेट्रोल ३० पैशांनी महागले, पहा तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या...

Petrol Diesel Price: पेट्रोल ३० पैशांनी महागले, पहा तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती

मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी १०७.८३ रुपये

Related Story

- Advertisement -

देशातील पेट्रोलच्या किंमतीत आज पुन्हा वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवल्या. गुरुवारी इंधनदरात वाढ झाली होती त्यानंतर शुक्रवारी दर जैसे थे होते मात्र आज शनिवारी पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली असून डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली नाहीय. देशात पेट्रोलच्या किंमतीत ३० पैशांनी वाढ झालीय. (Petrol Diesel Price: Petrol price hike by 30 paise)  तर मुंबईत २९ पैशांनी पेट्रोल महाग झाले आहे. जाणून घ्या मुंबईसह देशातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती.

मुंबईत पेट्रोलच्या किंमतींनी केव्हाच शंभरी पार केली त्यामुळे आता मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी १०७.८३ रुपये मोजावे लागतात. तर डिझेल ९७.४५ रुपये प्रतिलिटर आहे. राजधानी दिल्लीचा विचार केला असता दिल्लीत डिझेलच्या किंमती स्थिर असून पेट्रोलच्या किंमतीत ३० पैशांनी वाढले. दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी १०१.८४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक लिटर डिझेलसाठी ९८.८७ रुपये मोजावे लागणार आह. दिल्लीत सातत्याने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत दिल्लीत ४१ वेळा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. यात पेट्रोल १०.७९ रुपयांनी आणि डिझेल ८.९९ रुपयांनी महाग झाले.

इतर शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती

पुणे

- Advertisement -

पेट्रोल – १०७.२० रुपये प्रतिलिटर
डिझेल – ९५.५४ रुपये प्रतिलिटर

नागपूर

पेट्रोल – १०७.२० रुपये प्रतिलिटर
डिझेल – ९५.६७ रुपये प्रतिलिटर

नाशिक

- Advertisement -

पेट्रोल – १०७.५० रुपये प्रतिलिटर
डिझेल – ९६.२३ रुपये प्रतिलिटर

चेन्नई

पेट्रोल – १०२.४९ रुपये प्रतिलिटर
डिझेल – ९४.३९ रुपये प्रतिलिटर

कोलकाता

पेट्रोल – १०२.०८ रुपये प्रतिलिटर
डिझेल – ९३.०२ रुपये प्रतिलिटर


हेही वाचा – कधी रेल्वे स्टेशन तर कधी थिएटर आणि शाळा…पंतप्रधान मोदींचा असा आहे आयुष्याचा प्रवास

 

- Advertisement -