Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Petrol Diesel Price: पेट्रोलच्या किंमती शंभरी पार, जाणून घ्या मुंबईतील आजचे...

Petrol Diesel Price: पेट्रोलच्या किंमती शंभरी पार, जाणून घ्या मुंबईतील आजचे दर

रविवारी पेट्रोलच्या किंमतीत २९ पैशांनी आणि डिझेलच्या किंमतीत २८ रुपयांनी वाढ झाली होती.

Related Story

- Advertisement -

देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी शंभरी ओलांडली आहे. तेल कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नसला तरीही पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्यांना फटका बसला आहे. बाजारात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थे आहेत. रविवारी पेट्रोलच्या किंमतीत २९ पैशांनी आणि डिझेलच्या किंमतीत २८ रुपयांनी वाढ झाली होती. आज किंमतीत कोणताही बदल न केल्यामुळे दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नईमधील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. मुंबईचा विचार केला असता मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत झालेली वाढ ही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. मुंबईतील पेट्रोलच्या किंमती रविवारी शंभारी पार गेल्या आहेत. त्यामुळे आज जरी पेट्रोलच्या किंमतीत बदल झाले नसले तरीही मुंबईकरांना त्याचा काहीही फायदा झालेला नाही. जाणून घ्या देशातील प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर. (Petrol Diesel Price: Petrol prices cross hundreds today rates in Mumbai)

मुंबईत आज १ लीटर पेट्रोलसाठी मुंबईकरांना तब्बल १०३.३६ रुपये मोजावे लागणार आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीचा तीन अंकी आकडा पाहून मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर मुंबईत १ लीटर डिझेलसाठी मुंबईकरांना ९५.४४ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीतही आज पेट्रोलच्या किंमती जैथे असल्या तरीही १ लीटर पेट्रोलसाठी ९७.२२ रुपये द्यावे लागणार आहेत. तर दिल्लीत १ लीटर डिझेलसाठी ८७.९७ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकत्तामध्ये देखील पेट्रोलच्या किंमती शंभारी पार करण्याच्या वाटेवर आहेत. कोलकत्ता मध्ये १ लिटर पेट्रोलच्या किंमती ९७.१२ रुपये इतक्या आहेत. तर डिझेलच्या किंमती ९०.८२ इतक्या आहेत. कोलकत्ताच्या तुलनेत चेन्नईमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती जास्त आहेत. चेन्नईमध्ये १ लिटर पेट्रोल ९८.४० रुपये तर डिझेल ९२.५८ रुपये इतके आहे.

- Advertisement -

देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती रोज सकाळी सहा वाजता बदलल्या जातात. एक्ससाइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर वस्तूंनी पेट्रोल डिझेलच्या किंमती परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत याच्या आधारे पेट्रोल ,डिझेलचे दर दररोज बदलले जातात.


हेही वाचा – Baramulla Encounter: जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये LeTचा टॉप दहशतवादी मुदासिर पंडितसह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

- Advertisement -

 

- Advertisement -