Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल दराबाबत सर्वसामान्यांना आज दिलासा; जाणून घ्या दर

Petrol Diesel Price Today 10th April Not Changed Today Know Latest Rate Of Your City

महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने नागरिकांचे जगणे कठीण होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे देशात महागाई सातत्याने वाढत आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढल्यामुळे अन्न, पेय, दूध आणि इतर वस्तूंचे दरही वाढले आहेत. लोकांना गाडी आणि दुचाकी चालवण्यासाठी खिशाला कात्री बसत आहे. गेल्या 16 दिवसांत पेट्रोलचे दर एकूण 10 रुपयांची वाढल्याची नोंद झाली आहे. जाणून घ्या आज, रविवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाले?

सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नाही. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 4 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. शेवटची पेट्रोल-डिझेलची दरवाढ बुधवारी म्हणजे 6 एप्रिलला झाली होती. परंतु गेल्या 16 दिवसात पेट्रोलचे दर 10 रुपयांनी वाढले आहेत.

देशातील विविध राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात फरक असता. कारण वेगवेगळ्या राज्य सरकार वेगवेगळे इंधनावर व्हॅट घेते. सध्या देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत पाहा.

दिल्ली – पेट्रोल 105.41 रुपये प्रति लीटर, डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर
हैदराबाद – पेट्रोल 119.49 रुपये प्रति लीटर, डिझेल 105.49 रुपये प्रति लीटर
कोलकाता – पेट्रोल 115.12 रुपये प्रति लीटर, डिझेल 96.83 रुपये प्रति लीटर
बंगळुरू – पेट्रोल 111.09 रुपये प्रति लीटर, डिझेल 94.79 रुपये प्रति लीटर
मुंबई – पेट्रोल 120.51 रुपये प्रति लीटर, डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर
चेन्नई – पेट्रोल 110.85 रुपये प्रति लीटर, डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर


हेही वाचा – Pakistan political crisis : कोण आहेत शहबाज शरीफ? इम्रान खाननंतर होऊ शकतात पाकिस्तानचे पंतप्रधान