Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर तेल कंपन्यांनी केले जारी; जाणून घ्या काय आहेत आजचे दर?

शातील तेलाच्या दरांमुळे अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला झळ लागत आहे. काही राज्यांमध्ये अजूनही १००च्या वर पेट्रोलचे दर आहे.

petrol diesel price today 15 january 2022
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर तेल कंपन्यांनी केले जारी; जाणून घ्या काय आहेत आजचे दर?

सरकारी तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी करण्यात आले आहेत. आजच्या पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. सलग ४६व्या दिवसानंतर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून देशातील काही राज्यांमध्ये अजूनही पेट्रोलचे दर १०० रुपयांच्यावरती आहेत. देशातील तेलाच्या दरांमुळे अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला झळ लागत आहे.

दिल्लीत पेट्रोलचे दर ९५.४१ रुपये, तर डिझेलचे दर ८६.६७ रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत, कोलकातामध्ये पेट्रोलचे दर अजूनही १००च्या वर आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर १०९.९८ रुपये तर डिझेलचे दर ९४.१५ रुपये प्रति लीटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचे दर १०४.६७ रुपये तर डिझलचे दर ८९.७९ रुपये लीटर आहे.

जाणून घ्या महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दर किती?

आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लीटर पेट्रोल आणि डिझेलचे दर पुढीलप्रमाणे….

शहर           डिझेल       पेट्रोल
दिल्ली         ८६.६७      ९५.४१
मुंबई           ९४.१४       १०९.९८
कोलकाता     ८९.७९       १०४.६७
चेन्नई           ९१.४३        १०१.४०

या राज्यांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये

मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिसा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर जाऊन आरएसपी आणि तुमचा शहर कोड लिहून ९२२४९९२२४९ यानंबर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो, जो तुम्हाला आयओसीएल वेबसाईटवर मिळेल.


हेही वाचा – Work From Home करताय? तर BSNLचा हा प्लॅन देतोय दररोज 5GB डेटा आणि ८४ दिवसांची व्हॅलिडिटी, जाणून घ्या