घरताज्या घडामोडीToday Petrol-Diesel Price: आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका; बघा आजचे दर

Today Petrol-Diesel Price: आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका; बघा आजचे दर

Subscribe

तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर 93.04 रुपये प्रतिलिटर आहे, तर डिझेलच्या दरातही किरकोळ वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आज डिझेलची किंमत प्रति लिटर 83.80 रुपये आहे. कोलकातामध्येही पेट्रोल डिझेलच्या दरात 1 रुपये 19 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे गुरुवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत बुधवारीपर्यंत लिटरमागे 92.85 रुपये इतकी होती. त्याचबरोबर गुरुवारी डिझेलची किंमत प्रति लिटर 83.51 रुपये होती. यापूर्वी बुधवारी तेलाची किंमतही स्थिर होती. तर मुंबईत आज पेट्रोलची किंमत प्रति लिटर 99.32 रूपये तर डिझेलची किंमत 91.01, चेन्नईत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 93.11 रूपये तर डिझेलची किंमत 86.64रूपये अशी आहे.

- Advertisement -

येथे पेट्रोल झाले शंभरी पार

२ मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलिटर 2.48 रुपये आणि डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 2.78 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपरीपार गेले आहेत. सध्या भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100.91 रुपये तर डिझेलची किंमत प्रति लिटर 91.90 रुपये आहे. यासह राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत 103.38 रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत 95.92 रुपये प्रतिलिटर आहे. मध्य प्रदेशच्या रीवामध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 103.65 रुपयांवर पोहोचली असल्याने सामान्य नागरिकांना या महागाईचा फटका बसला आहे.

अशा जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर

पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज बदलत असतात. अशा परिस्थितीत, आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत तुम्हाला फक्त एका एसएमएसद्वारे कळू शकते. यासाठी इंडियन ऑईल IOCL ग्राहकांना आरएसपी कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा आरएसपी कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -