घरताज्या घडामोडीPetrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे दर

Subscribe

पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा आज वधारले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर आज, बुधवारी ३५ पैसे प्रति लीटर वाढले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर १०७.९४ रुपये प्रति लीटर झाले असून डिझेल ९६.६७ रुपये प्रति लीटर झाले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही उच्चांकी वाढ आहे.

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाले नव्हते. कालपर्यंत दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर १०७.५९ रुपये प्रति लीटर होते. तर रविवारी दिल्लीत डिझेलचे दर ९६.३१ रुपये प्रति लीटर होते. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे मुंबईत पेट्रोल ११३.८० रुपये प्रति लीटर विकले जात असून डिझेल १०४.७५ रुपये प्रति लीटर झाले आहे. देशातील सर्व महानगरांमध्ये पेट्रोल, डिझेल दर जास्त आहेत.

- Advertisement -

१८ आणि १९ ऑक्टोबरला इंधनाचे दर स्थिर होते, मात्र सलग चौथ्या दिवशी ३५ पैसे प्रति लीटर वाढले आहे. यापूर्वी २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान सलग पाच दिवस दर वाढत होते. १२ आणि १३ ऑक्टोबरला दरात कोणतेही बदल झाले नाही. पण पेट्रोल, डिझेलचे दर वधारल्यामुळे देशातील काही भागात १०० रुपये प्रति लीटर इंधन मिळत आहे. ५ सप्टेंबरपासून पेट्रोलच्या दरात स्थिरता होती, मात्र तेल कंपन्यांनी गेल्या आठवड्यात पेट्रोल दरात किंचीत वाढ केली आहे.

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? 

दिल्ली – पेट्रोल – १०७.९४, प्रति लीटर – डिझेल – ९६.६७, प्रति लीटर
मुंबई – पेट्रोल – ११३.८०, प्रति लीटर – डिझेल – १०४.७५, प्रति लीटर
चेन्नई – पेट्रोल – १०४.८३, प्रति लीटर – डिझेल – १००.९२, प्रति लीटर
कोलकाता – पेट्रोल – १०८.४६, प्रति लीटर – डिझेल – ९९.७८, प्रति लीटर

- Advertisement -

हेही वाचा – Emissions Gap Report 2021: जगाची भीषण तापमान वाढीच्या दिशेने वाटचाल, WMO रिसर्च


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -