Petrol-Diesel Price: पेट्रोल, डिझेलचे वाढते दर सर्वसामान्यांसाठी ठरतायत डोकेदुखी

मुंबईसह देशभरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ आहे. दररोज पैशांमध्ये होणारी वाढ ही आता सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. देशात आज पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येकी ८०-८० पैशांची वाढ झाली आहे.

Maharashtra government issues notification to cut VAT on CNG; fuel to be cheaper from Apr 1

मुंबईसह देशभरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ आहे. दररोज पैशांमध्ये होणारी वाढ ही आता सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. देशात आज पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येकी ८०-८० पैशांची वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. नव्या दरवाढीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर ८५ पैशांची तर डिझेलच्या दरांत ८५ पैशांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल ११६.६७ रुपये आणि डिझेल १००.८९ रुपयांवर पोहोचलं आहे.

मुंबईसह अनेक शहरांमध्ये बुधवारी डिझेलनं तर शंभरी ओलांडली आहे. मागील १० दिवसांत देशाच्या राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोल ६.४० रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल ६ रुपये ४० पैशांपर्यंत महागलं आहे. सध्या दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी १०१.८१ रुपये आणि डिझेलसाठी ९३.०७ रुपये मोजावे लागत आहेत.

मागील दिवसांपूर्वी म्हणजेच २१ मार्च रोजी राजधानीमध्ये पेट्रोलचे दर ९५.४१ आणि डिझेलचे दर ८६.६७ रुपयांवर होते. आता २२ मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. २२ मार्च ते २३ मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेल प्रतिदिन ८० ते ८० पैशांनी महागलं होतं. २४ मार्चला त्यात कोणताही बदल झाला नाही, मात्र २५ मार्चपासून पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल २६ पर्यंत ८०-८० पैशांनी वाढलं. २७ मार्च रोजी पेट्रोल ५० पैसे तर डिझेल ५५ पैसे महागलं. २८ मार्च रोजी पेट्रोल ३० पैशांनी तर डिझेल ३५ पैशांनी वाढलं. २९ मार्च रोजी पेट्रोल ८० पैशांनी आणि डिझेल ७० पैशांनी वाढलं. ३० मार्चला पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८०-८० पैशांनी वाढ झाली. ३१ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर ८० पैशांनी वाढले.

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.


petrol diesel price today 31th march 2022 iocl delhi mumbai petrol price increased