आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. आज डिझेलच्या दरात 9 पैशांची वाढ झाली आहे तर पेट्रोलच्या दरात 35 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नईमध्येही पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे देशभरात सर्वच राज्यात पेट्रोल-डिझेलची किंमत ही नव्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सध्या मुंबईत पेट्रोल 106.59 रुपये आणि डिझेलचा प्रतिलिटर दर 97.18 रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोलने काही दिवसांपूर्वीच मुंबईत शतक पार केल्याने पुन्हा एकदा सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे.
मुंबईत पेट्रोलच्या दराचा उच्चांक
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आर्थिक राजधानी मुंबईत आज एका लीटर पेट्रोलची किंमत ही 106.59 रुपये असून डिझेलची किंमत प्रतिलिटर 97.18 रुपयांवर पोहोचली आहे. तसेच, दिल्लीत पेट्रोलची किरकोळ किंमत 100.56 रुपयांवर पोहोचली आहे. तर डिझेलची किरकोळ किंमत ही प्रतिलिटर 89.62 रुपयांवर पोहोचली आहे.
Petrol at Rs 100.56/litre (an increase of Rs 0.35) today in Delhi, diesel at Rs 89.62/litre (an increase of Rs 0.09)
Petrol at Rs Rs 108.88/litre (an increase of Rs 0.25) today in Bhopal (MP), diesel at Rs 98.40/litre (unchanged) pic.twitter.com/XqRaUlJFV8
— ANI (@ANI) July 8, 2021
जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. तर तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. आजचा पेट्रोल आणि डिझेलचा दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.