Petrol Diesel Price : निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Petroleum companies issue new rates for petrol and diesel
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, मुंबईतील इंधनाचे दर जाणून घ्या

उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरानुसार, दिल्लीसह विविध महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र विधानसभ निवडणुका संपल्यानंतर आणि निकास लागल्यानंतर देशभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात अशी भीती व्यक्त होत होती. परंतु देशात अद्याप इंधनाच्या दरात कोणताही दरवाढ झालेली नाही.

IOCL नुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपयांना विकलं जात आहे. त्याचबरोबर कोलकात्यात पेट्रोल 104.67 रुपयांना तर डिझेल 89.79 रुपयांना मिळत आहे. दुसरीकडे चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.40 रुपये आणि डिझेलची किंमत 91.43 रुपये आहे.

प्रमुख शहरांमधील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

शहराचे नाव      पेट्रोल          डिझेल
दिल्ली           95.41        86.67
मुंबई             109.98       94.14
कोलकाता       104.67       89.79
चेन्नई             101.40       91.43
भोपाळ           107.23      90.87
रांची              98.52        91.56
बंगलोर          100.58        85.01
चंदीगड          94.23        80.90
पाटणा           109.92       91.09
नोएडा           95.51         87.01

रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या

गेल्या सलग 15 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. याचा परिणाम देश-विदेशातील सर्वत मालावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

SMS द्वारे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे दर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही दररोज SMS द्वारे देखील जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP मिळेल कोड लिहून तो 9224992249 या क्रमांकावर पाठवा. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

https://iocl.com/petrol-diesel-price


UP Assembly Elections Result 2022 : उत्तर प्रदेशमधील भाजपच्या विजयाची ‘ही’ आहेत पाच कारणे