घरदेश-विदेशPetrol-Diesel Price Today: आज पुन्हा वाढले पेट्रोलचे दर; लवकरच डिझेल शंभरी गाठणार

Petrol-Diesel Price Today: आज पुन्हा वाढले पेट्रोलचे दर; लवकरच डिझेल शंभरी गाठणार

Subscribe

देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच असून आजा पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलनं इतिहासात पहिल्यांदाच शंभरीपार मजल मारली आहे. मुंबईत देखील पेट्रोल १०० च्या पार गेलं आहे. तर लवकरच डिझेल देखील लवकरच शंभरी गाठणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, वाढत्या इंधन दरांचा ऐन करोनाच्या संकटकाळात आर्थिक पेच निर्माण झालेला असताना सर्वसामान्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे.

तेल कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल आज ३५ पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी महागलं आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०६.९३ पैसे तर डिझेल प्रतिलिटर ९७.४६ पैसे इतकी किंमत आहे. राजधानी दिल्लीमध्ये इंडियन ऑइलच्या पंपावर पेट्रोल १००.९१ रुपये प्रति लिटरनं तर डिझेल ८९.८८ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

- Advertisement -

शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती :

मुंबईत आज पेट्रोल १०६.९२ रुपये आणि डिझेल ९७.४६ रुपये प्रति लिटर
चेन्नईत आज पेट्रोल १०१.६७ रुपये आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रति लिटर
कोलकाता मध्ये आज पेट्रोल १०१.०१ रुपये आणि डिझेल ९२.९७ रुपये प्रति लिटर
बंगळुरुत आज पेट्रोल १०४.२९ रुपये आणि डिझेल ९५.२६ रुपये प्रति लिटर
भोपाळमध्ये आज पेट्रोल १०९.२४ रुपये आणि डिझेल ९८.६७ रुपये प्रति लिटर
पाटनामध्ये आज पेट्रोल १०३.१८ रुपये आणि डिझेल ९५.४६ रुपये प्रति लिटर
चंदीगढमध्ये आज पेट्रोल ९७.०४ रुपये आणि डिझेल ८९.५१ रुपये प्रति लिटर
लखनौमध्ये आज पेट्रोल ९८.०१ रुपये आणि डिझेल ९०.२७ रुपये प्रति लिटर
रांचीत आज पेट्रोल ९५.९६ रुपये आणि डिझेल ९४.८४ रुपये प्रति लिटर

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -