Petrol-Diesel Price Today : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा मोठी वाढ, पुण्यात पेट्रोल १०९ पार

Petrol-Diesel Price Today petrol diesel price 10 october fuel rate record highs diesel crossed rs 100
Petrol-Diesel Price Today : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा मोठी वाढ, पुण्यात पेट्रोल १०९ पार

देशात ऐनसणासुदीच्या काळात गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींमुळे सर्व सामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यातच आता पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्येही सतत भाववाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबई, पुण्यासारख्या देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती १०० रुपयांच्या वर पोहचले आहे. तर मुंबईत डिझेलनेही शंभरी गाठली आहे. देशात आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर जाहीर करण्यात आले. यात डिझेलचे दर प्रति लिटर ३५ पैशांनी वाढले आहेत. तर पेट्रोल प्रति लिटर ३० पैशांनी महागले आहे. या इंधन दरवाढीमुळे आज दिल्लीत पेट्रोल १०४.१४ रुपये प्रति लिटर आणि तर डिझेलचा ९२.८२ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल ११०.१२ रुपये प्रति लीटर आणि डिझेल १००.६६ रुपये प्रति लीटर विकले जात आहे. याशिवाय कोलकातामध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे १०४.८० रुपये आणि ९५.९३ रुपये प्रति लीटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.५३ रुपये लिटर आणि डिझेल ९७.२६ रुपये प्रति लीटरने खरेदी करावे लागत आहे. यात पुण्यातही पेट्रोलने १०९ रुपयांचा आकडा पार केला आहे.

 

मुंबई, दिल्लीच नाही देशातील २६ राज्यांमध्ये पेट्रोल -डिझेनले शंभरी पार केली आहे. यात म्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये पट्रोल १०० रुपयांच्यावर विकले जात आहे. सर्वात महाग पेट्रोल राजस्थानमध्ये विकले जातेय.

ऑक्टोबरमध्ये ९ दिवसात पेट्रोल २.२० रुपयांनी तर डिझेल २.६० रुपयांनी महागले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची वाढती मागणी पाहता त्याची किंमत ९० डॉलर पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अजून २ ते ३ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. तर देशातील सरकारी तेल कंपन्यांकडूनही इंधनाच्या वाढत्या किंमतींचा बोझा ग्राहकांवर लादण्यास सुरुवात झाली आहे. कारण शुक्रवारी पुन्हा पेट्रोल लिटरमागे ३० पैसे, तर डिझेल ३५ पैशांनी महागले. यानंतर शनिवारी पुन्हा पेट्रोलच्या किंमतीत ३० पैसे प्रति लीटरने आणि डिझेल ३५ पैसे प्रति लिटरने महाग करण्यात आले.