Petrol-Diesel Price Today: साडेचार महिन्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या प्रति लीटर दर

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर १३० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. यावेळेस देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्यात आले नव्हते.

Petrol-Diesel Price Today petrol, diesel prices increased by more than 80 paise per litre
Petrol-Diesel Price Today: साडेचार महिन्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या प्रति लीटर दर

देशात बऱ्याच दिवसांपासून स्थिर असणारे पेट्रोल-डिझेलचे दर आता साडेचार महिन्यानंतर वाढले आहेत. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे ८४ पैसे आणि ८३ पैशांनी प्रति लीटर वाढवण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ९५.४१ रुपये प्रति लीटरवरून ९६.२१ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेलचे दर ८६.६७ रुपये प्रति लीटरहून महाग होऊन आता ८७.४७ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे.

जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट ऑईलचे दर घसरून १०० डॉल प्रति बॅरल झाले आहेत, तेव्हा राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवण्यात आले आहे. दरम्यान रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर १३० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. यावेळेस देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्यात आले नव्हते. पण आता निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

भारतीय पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या लेटेस्ट अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर १०९.९८ रुपये प्रति लीटर होते, ते आता २२ मार्चला ११०.८२ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. तर डिझेलचे दर ९५ रुपये प्रति लीटर झाले आहे, जे साडे चार महिन्यापासून ९४.१४ रुपये प्रति लीटर विक्री होत होते.

दिल्ली

पेट्रोल – ९६.२१ रुपये प्रति लीटर
डिझेल – ८७.४७ रुपये प्रति लीटर

मुंबई

पेट्रोल – ११०.८२ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९५.०० रुपये प्रति लीटर

चेन्नई

पेट्रोल – १०२.१६ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९२.१९ रुपये प्रति लीटर

कोलकाता

पेट्रोल – १०५.५१ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९०.६२ रुपये प्रति लीटर


हेही वाचा – मोदी सरकारच्या काळात ईडीच्या 2974 धाडी