घरदेश-विदेशPetrol-Diesel Price: देशभरात १४ दिवसांत बाराव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या आजचे...

Petrol-Diesel Price: देशभरात १४ दिवसांत बाराव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

Subscribe

देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत. सोमवारीही मुंबईसह देसभरात पुन्हा एकदा सोमवार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ४०-४० पैशांनी वाढ झाली आहे.

देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत. सोमवारीही मुंबईसह देसभरात पुन्हा एकदा सोमवार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ४०-४० पैशांनी वाढ झाली आहे. यासह दिल्लीत आता पेट्रोल १०३.८१ रुपये आणि डिझेल ९५.०७ रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईच पेट्रोलचे भाव ११८ रुपयांच्या पुढे गेले आहेत. १४ दिवसांत बाराव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या माहितीनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ४ एप्रिल २०२२ रोजी पेट्रोलचे दर प्रति लिटर ११८.८३ रुपये झाले आहेत. तर डिझेलचा दर १०३.०७ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. स्थानिक करानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या राज्यानुसार बदलत असतात. देशातील चार प्रमुख शहरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. दिल्लीशिवाय इतर सर्व शहरांमध्ये डिझेलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे.

- Advertisement -

१४ दिवसांत पेट्रोल ८.४० रुपयांनी महागलं आहे. सध्या देशात पेट्रोल-डिझेलसह एलपीजी सिलिंडर, दूध, भाजीपाला यासह दैनंदिन वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामन्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

- Advertisement -

दिल्ली

  • पेट्रोल – 103.81 रुपये प्रति लिटर
  • डिझेल – 95.07 रुपये प्रति लिटर

मुंबई

  • पेट्रोल – 118.83 रुपये प्रति लिटर
  • डिझेल – 103.07 रुपये प्रति लिटर

कोलकाता

  • पेट्रोल – प्रति लिटर रु
  • डिझेल – प्रति लिटर रु

चेन्नई

  • पेट्रोल – 109.34 रुपये प्रति लिटर
  • डिझेल – 99.42 रुपये प्रति लिटर

२२ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत १४ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १२ वेळा वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, २४ मार्च आणि १ एप्रिल रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही, त्यामुळे देशभरातील किमती स्थिर होत्या. बहुतांश दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८० पैशांनी वाढ झाली आहे.

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.


हेही वाचा – राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -