Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश पेट्रोल, डिझेलच्या करात कोणतीही वाढ केली नाही, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची राज्यसभेत माहिती

पेट्रोल, डिझेलच्या करात कोणतीही वाढ केली नाही, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची राज्यसभेत माहिती

Related Story

- Advertisement -

संपूर्ण देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाशी सामना करत असतानाच गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे.  इंधनाच्या सतत वाढणाऱ्या या किंमतींमुळे  मात्र सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडं चांगलेचं मोडलं आहे. या वाढत्या पेट्रोल- डिझेलच्या किंमतींवरून विरोधकांनाकडूनही केंद्रावर जोरदार निशाणा साधला जात आहे. मात्र केंद्र सरकारकडून या मुद्द्यावर आज राज्यसभेत स्पष्टीकरण देण्यात आले. गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले.

पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्यसभेत उपस्थित एका प्रश्नाला लेखी उत्तर देत ही माहिती दिली. यावेळी पुरी म्हणाले की, गेल्या एका वर्षात पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय करात कोणतीही वाढ झालेली नाही. उच्च आंतरराष्ट्रीय उत्पादनाच्या आधारभूत किंमती आणि विविध राज्य सरकारद्वारे आकारण्यात आलेल्या वॅट करामध्ये वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. देशात कच्चे तेल, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबतची माहिती सरकारलाही आहे. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर इंधनाच्या आंतरराष्ट्रीय किंमतींच्या अस्थिरतेसंदर्भातील मुद्दा उचलून धरत आहोत. असेही ते म्हणाले.

- Advertisement -

हरदीपसिंग पुरी म्हणाले की, पेट्रोल- डिझलचे दर अनुक्रमे २६ जून २०१० आणि १९ ऑक्टोबर २०१४ दरम्यान बाजार भावानुसार ठरवले गेले. त्यामुळे बाजार किंमतींवर दर निश्चित करण्यात आले. मात्र आता सार्वजनिक तेल विपणन कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधनाच्या किंमती आणि अन्य बाजारपेठांच्या परिस्थितीचा आढावा घेत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी जास्त करीत आहे. या सार्वजनिक तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय किंमती आणि रुपया-डॉलर विनिमय दरामधील बदल लक्षात घेऊनच पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी- जास्त करत आहे असेही ते म्हणाले.

दुसरीकडे, सार्वजनिक तेल कंपन्यांनी (ओएमसी) सलग ११ व्या दिवशी इंधनाच्या दर कोणतेही बदल केले नाहीत. बुधवारी राजधानीत पेट्रोल १०१.८४ रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर डिझेल प्रतिलिटर ८९.८७ रुपये दराने विकले जात आहे. परंतु १८ जुलैपासून इंधनाच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेले नाहीत. मात्र आदल्या दिवशी पेट्रोल प्रतिलिटर ३० पैशांनी महागल होते, तर डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता.


बँक खातेदारांना केंद्राचा दिलासा, दिवाळखोर बँकांतील ठेवीदारांना ९० दिवसांत मिळणार ५ लाख रुपये


- Advertisement -

 

- Advertisement -