Petrol-Diesel Prices Today: आजपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये घट, नागरिकांना मोठा दिलासा

Petrol Diesel prices fall from today after union government decision
Petrol-Diesel Prices Today: आजपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये घट, नागरिकांना मोठा दिलासा

केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केली असल्याची घोषणा केली आहे. पेट्रोल 9 रुपये तर डिझेल 7 रुपयांनी कमी केले आहे. यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंधनाच्या दरात आजपासून कपात केल्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात मोठी घट झाली आहे. गेल्या 45 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यानंतर 22 मे रोजी केंद्राकडून दर कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने दर कपात केल्याची घोषणा केल्यानंतर देशात इंधनाचे दर कपात करण्यात आले आहेत. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपये लिटर आणि डिझेल 6 रुपये लीटरने कमी करण्याच्या घोषणेसह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की या निर्णयामुळे पेट्रोलचे दर 9.5 रुपये लिटर आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होतील.

केंद्राच्या घोषणेनंतर दिल्लीत पेट्रोल 9.5 रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 105.41 रुपये होते तर आता 96.72 पर्यंत पोहोचले आहेत. त्याच वेळी, डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लीटर झाली आहे, जी आधी 96.67 रुपये होती. मुंबईत उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोलचा एक लिटरचा दर 111.35 रुपयांवर तर डिझेलचा दर 97.28 रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 102.65 रुपये आणि 94.24 रुपये प्रति लिटर आहेत. तर कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये आहे. बंगळुरूमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.94 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 87.89 रुपये झाली आहे.

पेट्रोलच्या दराचा ब्रेकअप? (इंडियन ऑइल वेबसाइटनुसार)

मूळ किंमत- रु 57.13/लिटर
मालवाहतूक इ- रु ०.२०/लिटर
डीलर्सकडून आकारलेली किंमत (अबकारी शुल्क आणि व्हॅट) – रु 57.33/लिटर
उत्पादन शुल्क- 19.90 रुपये/लिटर
डीलर कमिशन (सरासरी) – रु.3.78/लिटर
व्हॅट (डीलरच्या कमिशनवर व्हॅटसह) – रु 15.71/लिटर
दिल्लीतील किरकोळ विक्री किंमत – (गोलाकार) – रु 96.72/लिटर

डिझेलच्या दराचा ब्रेकअप?

मूळ किंमत- रु 57.92/लिटर
मालवाहतूक इ – रु ०.२२/लिटर
डीलर्सकडून आकारली जाणारी किंमत (अबकारी शुल्क आणि व्हॅट) – रु.58.14/लिटर
उत्पादन शुल्क- रु 15.80/लिटर
डीलर कमिशन (सरासरी) – रु 2.57/लिटर
व्हॅट (डीलरच्या कमिशनवर व्हॅटसह) – रु. 13.11/लिटर
दिल्लीमध्ये किरकोळ विक्री किंमत – रु 89.62/लिटर


हेही वाचा : Assam Flood : पुरामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत, ३१ जिल्हे पाण्याखाली, ६.८० लाख लोकांना पुराचा तडाखा