घरताज्या घडामोडीPetrol Diesel Price: चार दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, जाणून घ्या आजचे...

Petrol Diesel Price: चार दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतात पेट्रोल-डिझेलचे दर सतत वाढत आहेत. चार दिवसांत पेट्रोल-डिझेल तिसऱ्यांदा महागले आहे. सलग दोन दिवसांच्या दरवाढीनंतर काल, गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. पण आज पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा ८० पैशांनी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननुसार, आज देशाची राजधानी दिल्लीत ८० पैशांची वाढ झाल्यानंतर एक लीटर पेट्रोलची किंमत ९७.८१ रुपये झाली आहे. तर डिझेल ८९.०७ रुपयांनी विकत आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्यानंतरपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नव्हते. त्यानंतर मंगळवारपासून तेलाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. IOCLनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत ११२.५१ रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत ९६.७० रुपये प्रति लीटर झाले आहे. तर कोलकातामध्ये १०७.१८ रुपये प्रति लीटर पेट्रोल आणि ९२.२२ रुपये प्रति लीटर डिझेल विक्री होत आहे. चौथ्या महानगर चेन्नईत आज १०३.६७ रुपये पेट्रोल प्रति लीटर आणि ९३.७१ रुपये प्रति लीटर डिझेल झाले आहे.

- Advertisement -

इंडियन ऑईलने रशियाकडून खरेदी केले कच्चे तेल

रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान भारत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करत आहे. इंडियन ऑईलने बुधवारी कच्च्या तेलाची मोठी खेपची खरेदी पूर्ण केली आहे. शिवाय कंपनीने वेस्ट आफ्रिकन ऑईल मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहे. रॉयटर्सच्या सुत्रानुसार, देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईलने मे महिन्यासाठी रशियाकडून ३० लाख बॅरेल कच्चे तेल खरेदी केले आहे. तर २० लाख बॅरेल वेस्ट आफ्रिकन ऑईल खरेदी केले आहे. कंपनीने रशियाच्या या कच्च्या तेलाला Vitol नावाच्या ट्रेडरकडून मोठ्या प्रमाणात सवलतीत खरेदी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – PNG CNG Rate Hike : पेट्रोल- डिझेल, एलपीजीपाठोपाठ आता पीएनजी- सीएनजी महागले; जाणून घ्या आजचा दर


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -