घरताज्या घडामोडीPetrol-Diesel Price Today: सलग दुसऱ्या दिवशी महागाईचा भडका! आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात...

Petrol-Diesel Price Today: सलग दुसऱ्या दिवशी महागाईचा भडका! आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

Subscribe

केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरातून जनतेला दिलासा दिला होता. सरकारने थेट एक्साइज ड्यूटीमध्ये पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपये कपात केले होते.

देशात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणूक संपताच काही दिवसानंतर महागाई सुरू झाली आहे. आज पुन्हा एकदा सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लीटर ८० पैशांनी वाढ केली आहे. देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलची किंमत ९७.०१ रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत ८८.२७ रुपये प्रति लीटर झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. महिन्याभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर होत आहे. देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका असल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. पण १० मार्चला निकाल जाहीर झाल्यानंतर कालपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे.

मुंबईतील पेट्रोचे भाव गगनाला भिडले

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर १११.६७ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल ९५.८५ रुपये प्रति लीटर झाले आहे. देशातील आणखीन एका महानगर कोलकातामध्ये पेट्रोल १०६.३४ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९१.४२ रुपये प्रति लीटर विकत आहे. याशिवाय चेन्नईत पेट्रोलचे दर प्रति लीटर १०२.९१ रुपये आणि डिझेलचे दर प्रति लीटर ९२.९५ रुपये झाले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरातून जनतेला दिलासा दिला होता. सरकारने थेट एक्साइज ड्यूटीमध्ये पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपये कपात केले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश बिहारसह जवळपास सर्व राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटचे दर कपात झाले होते. त्यानंतर काही महिने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली नाही. मग साडेचार महिन्यानंतर कालपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात येत आहे.


हेही वाचा – घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महाग; सर्वसामान्यांना महागाईचा चटका


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -