घरदेश-विदेशPetrol Diesel Price : सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या...

Petrol Diesel Price : सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या शहारातील दर

Subscribe

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा किमतींमध्ये वाढ झाल्याने पेट्रोलिय कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा सपाटा सुरु केला आहे. शुक्रवारी दिल्लीच्या बाजारात पेट्रोलच्या किंमतीत २८ पैशांची वाढ झाली आहे. दरवाढीनंतर पेट्रोल ९१.२७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेलदेखील ३१ पैशांनी वाढून ८१.७३ रुपये प्रतिलिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २७ पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरात ३३ पैशांची वाढ झाली आहे. ही किंमत वाढल्यानंतर मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९७.६१ रुपये आणि डिझेलची किंमत ८८.८२ रुपये प्रतिलिटर अशी झाली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आल्याचे दिसले नाही. मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर या काळात चार पटीने कमी झाले आहे. तेल कंपन्यांच्या या हालचालीमुळे पेट्रोल ७७ पैसे प्रति लीटर स्वस्त झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून वाढीमुळे आता पेट्रोल प्रतिलिटर ९० पैशांनी महागल्याचे दिसतेय. मे महिन्याच्या पूर्वी २७ फेब्रुवारी २०२१ रोजी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर १७ पैशांची शेवटची वाढ केली होती. यानंतर दोन महिन्यांहून अधिक काळ कोणतीही इंधनदरवाढ करण्यात आलेली नव्हती. मार्च-एप्रिल महिन्यात तेलाच्या किंमती चार दिवस घसरल्या होत्या. या कमी किंमतीमुळे डिझेल प्रतिलिटर ७४ पैशांनी स्वस्त झाले होते. आता सलग चार दिवसांपासून इंधन दरवाढीमुळे डिझेल प्रतिलिटर १ रुपये महाग झाले आहे.

- Advertisement -

जाणून घ्या कोणत्या शहरात किती आहे दर

  • दिल्ली- पेट्रोल 91.27  डिझेल 81.73
  • मुंबई – पेट्रोल 97.61 डिझेल 88.82
  • चेन्नई – पेट्रोल 93.15 डिझेल 86.65
  • कोलकाता – पेट्रोल 91.41 डिझेल 84.57
  • भोपाळ – पेट्रोल 99.28 डिझेल 90.01
  • रांची – पेट्रोल 88.57 डिझेल 86.34
  • बेंगलुरु – पेट्रोल 94.30 डिझेल 86.64
  • पटना – पेट्रोल 93.92 डिझेल 86.94
  • चंडीगढ़ – पेट्रोल 87.80 डिझेल 81.40

‘या’ ठिकाणी पाहू शकता पेट्रोल-डिझेलचे दर

इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर दररोज पाहता येऊ शकतात. दरम्यान एसएमएसद्वारेही तुम्हाला पेट्रोल- डिझेलच्या किंमतींची माहिती मिळवू शकते यासाठी तुम्हाला RSP आणि तुमच्या शहराचा पिन कोड टाईप करुन 9224992249 या क्रमांकावर एस मेसेज पाठवावा लागतो.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -