Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Petrol Diesel Price: देशात सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरवाढ; जाणून घ्या तुमच्या...

Petrol Diesel Price: देशात सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरवाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Related Story

- Advertisement -

देशात आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका संपताच ही इंधन दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपल्यानंतर लगेचच सर्वसामान्यांना महागाईचा फटका पुन्हा बसण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या दोन महिन्य़ांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झाल्याचे समोर आले नव्हते. मात्र या काळात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार झाला असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज बुधवारी देशात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे १९ आणि २१ पैशांची वाढ नोंदवण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यानंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल ९०.७४ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८१.१२ रुपये प्रति लीटर तर चेन्नई मध्ये पेट्रोल ९२.७० रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८६.०९ रुपये प्रति लीटर आहे. तर कोलकात्यातील दरांत वाढ होत, पेट्रोल ९०.९२ रुपये आणि डिझेल ८३.९८ रुपये प्रति लीटर लीटर झाले आहे.

- Advertisement -

यासोबतच महाराष्ट्रात देखील इंधन दरवाढ झाली असून मुंबईत पेट्रोलची किंमत ९७.१२ रुपये प्रति लीटर झाली असून डिझेल ८८.१९ रुपये प्रति लीटर झाले आहे. पुण्यात पेट्रोलची किंमत ९६.७६ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८६.५० रुपये प्रति लीटर झाले आहेत. नाशिकमध्ये पेट्रोल ९७.५३ रुपये प्रति लीटर, डिझेल ८७.२४ रूपये तर औरंगाबादमध्ये पेट्रोलची किंमत ९८.३५ रुपये प्रति लीटर, डिझेल ८९.४३ रूपये झाले आहे.

- Advertisement -

असे बघा पेट्रोल डिझेलचे दर

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर पाहता येतील.

- Advertisement -