घरदेश-विदेशसर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार

सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार

Subscribe

कोविड मदत निधीसाठी सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. कोविड मदत निधी उभारण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होणार आहे. केंद्र सरकार पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलवरी एक्साइज ड्यूटी (Petrol Diesel Excise Duty -उत्पादन शुल्क/अबकारी कर) वाढवण्याच्या तयारीत असून ३ ते ६ रुपये प्रति लीटरपर्यंत एक्साइज ड्यूटी वाढवण्याची शक्यता आहे.

केंद्राने याआधी देखील कर वाढवला होता. मे महिन्याच्या दरम्यान, पेट्रोलवर १० रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर १३ रुपये प्रति लीटर एक्साइज ड्यूटी वाढवण्याची घोषणा केली होती. दरम्यान, पुन्हा एकदा एक्साइज ड्यूटी वाढवणार असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पेट्रोल आणि डिझेल वरील कर सातत्याने वाढत आहे. मे २०१४ मध्ये पेट्रोलवर एकूण कर ९.४८ रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर ३.५६ रुपये प्रति लीटर होता. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलवरील कर वाढून ३२.९८ प्रति लीटर आणि डिझेलवरील कर ३१.८३ रुपये प्रति लीटर झाला आहे. कच्चा तेलाच्या किंमती जरी कमी झाल्या असल्या तरी सर्वसामान्यांना याचा फायदा होताना दिसत नाही आहे. कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार सतत कर वाढवत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार कोरोनामुळे रसातळाला गेलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा उभारी आणण्यासाठी सरकार मदत पॅकेजची तयारी करत आहे. सरकारला अधिक फंडची गरज असून सरकार याची भरपाई टॅक्सद्वारे करत आहे. मात्र टॅक्स वाढल्यानंतर, पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढू नये यासाठी सरकारकडून नव्या योजनांवर काम सुरू आहे.

petrol price chart

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -