घरताज्या घडामोडीPetrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे...

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर

Subscribe

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसमान्यांच्या आर्थिक खर्चात वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे जर स्थिर आहेत. परंतु, आतंरराष्ट्रीय बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या दरांत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसमान्यांच्या आर्थिक खर्चात वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे जर स्थिर आहेत. परंतु, आतंरराष्ट्रीय बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या दरांत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दराच वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, क्रूड ऑईल महागल्यामुळे पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे.

राष्ट्रीय राजधानीत एक लिटर पेट्रोलची किंमत 105.41 रुपये असून डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत. इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.

- Advertisement -

देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

- Advertisement -

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. शिवाय, इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. तसंच, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).


हेही वाचा – Reliance Industries : ‘रिलायन्स’ ठरली 100 अब्ज डॉलर कमावणारी पहिली भारतीय कंपनी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -