घरदेश-विदेशPetrol, Diesel Prices : महागाईचा भडका: तीन राज्यांमध्ये पेट्रोलने ओलांडली शंभरी

Petrol, Diesel Prices : महागाईचा भडका: तीन राज्यांमध्ये पेट्रोलने ओलांडली शंभरी

Subscribe

देशात दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. यात पेट्रोलियम कंपन्यांकडून एक दिवसाआड इंधन दरवाढ केली जात आहे. कोरोनामुळे आधीच मेटाकूटीला आलेला ग्राहक आणि मालवाहतूकदारांचे या दरवाढीने कंबरडे मोडले आहे. यात आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. देशातील जवळपास तीन राज्यांमध्ये आज पेट्रोलने १०० रुपयांची पातळी गाठली आहे. राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल ३५ पैशांनी महागले आहे. देशातील राज्यांमधील पेट्रोल- डिझेलचे नवीनतम दर जाणून घ्या. आज पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याने आता दिल्लीत पेट्रोल ९९.१६ रुपये झाले आहे. मात्र, आज डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. सध्या दिल्लीत डिझेल ८९.१८ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

आज शनिवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०५.२५ रुपयांवर पोहचला आहे. आज दिल्लीत पेट्रोल ९९.१६ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव १००.१५ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९८.९९ रुपये झाला आहे. तर बंगळुरूमध्ये आज पेट्रोल १०२.४६ रुपयांवर पोहचले आहे. आज शुक्रवारी देशभरात पेट्रोल ३५ पैशांनी महागले आहे. तर मुंबई, चेन्नई, बंगळुरु या राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्यावर पोहचले आहे.

- Advertisement -

मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव ९६.७२ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८९.१८ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ९३.७३ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ९२.०३ रुपये प्रती लीटर झाले आहे. बंगळुरुमध्ये डिझेलचा दर ९४.५४ रुपये झाला आहे.

इंधनावरील टॅक्समधून केंद्र सरकारची बक्कळ कमाई

आरटीआयच्या माध्यमातून ही बाब उघडकीस आली आहे की, कोरोना काळात केंद्र सरकारची पेट्रोलियम उत्पादनांवरील कस्टम आणि एक्साइज ड्यूटीतून शुल्कातून मिळणारी कमाई ५६ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. तर अप्रत्यक्ष करातून सुमारे २.८८ लाख कोटी रुपये सरकारने कमावले आहेत.

- Advertisement -

२०२०-२१ मध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवर ३७ हजार ८०६ कोटी रुपयांची कस्टम ड्युटी वसूल केली गेली. तर सेंट्रल एक्साईज ड्यूटीने ४.१३ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीत कस्टम ड्युटी म्हणून ४६ हजार कोटींची कमाई झाली आहे.

दोन महिन्यांत पेट्रोल ८.७६ रुपयांनी महागले

१ मे पासून ९०.४० रुपये प्रति लिटरच्या किंमतीपासून सुरु झालेले पेट्रोल आता राजधानी दिल्लीत ९९.१६ रुपयांवर पोहचले आहे. गेल्या ६० दिवसांत ८.७६ रुपयांची वाढ झाली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -