घर देश-विदेश पेट्रोल दरवाढ थांबली; डिझेल मात्र महाग

पेट्रोल दरवाढ थांबली; डिझेल मात्र महाग

Subscribe

मुंबईमध्ये आज पेट्रोलच्या दरात ०.०८ पैशांनी घट झाली असून, शहरातील आजचा पेट्रोलचा दर ७०.३३ रुपये प्रतिलिटर इतका आहे.

एकीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हैराण असेलेले सामान्य नागरिक, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळेही त्रस्त झाले आहेत. मागील पाच ते सहा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे, सर्वसामान्य लोकांसाठी दुष्काळात तेरावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आज (बुधवारी) नागरिकांना दिलासा मिळाल्याचं चित्रं आहे. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या पेट्रोल दरवाढीला आज ब्रेक लागला आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ०.०८ पैशांनी कमी झालं असून, पेट्रोलचा आजचा दर ७०.३३ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर, मुंबईमध्ये आज पेट्रोलच्या दरात ०.०८ पैशांनी घट झाली असून, शहरातील आजचा पेट्रोलचा दर ७०.३३ रुपये प्रतिलिटर इतका आहे. पेट्रोलमध्ये झालेल्या या कपातीमुळे सामान्य जनतेला कुठेतरी दिलासा मिळाला असणार हे नक्की. मात्र, पेट्रोलचा दर जरी कमी झाला असला तरी आज डिझेलचा भाव वाढला आहे.


डिझेलचा चढता आलेख…

आजच्या दिवशी डिझेलच्या दरामधील वाढ मात्र कायम आहे. दिल्लीमध्ये आज डिझेल ०.१२ पैशांनी महाग झालं असून, आजचा डिझेलचा भाव ६४.५९ रुपये प्रतिलिटर इतका आहे. त्याचबरोबर मुबंईत आज डिझेल ०.१३ पैशांनी महागले असून, आजचा दर प्रतिलिटर ६७.६२ रुपयांवर जाऊन पोहचला आहे. मध्यंतरी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती प्रकर्षाने कमी झाल्या होत्या. मात्र, आता पुन्हा कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार सुरु असल्याकारणाने  देशातील पेट्रोल- डिझेलचे दर कमी-जास्त होत आहेत. आज पेट्रोलची दरवाढ थांबली असली तरी ती किती काळापर्यंत स्थिर राहील हे सांगणे अवघड ठरेल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -