घरदेश-विदेशपेट्रोल - डिझेलचे दर घसरले, जाणून घ्या आजचा भाव

पेट्रोल – डिझेलचे दर घसरले, जाणून घ्या आजचा भाव

Subscribe

आज मुंबईमध्ये पेट्रोल १.०९ प्रतिलीटर तर डिझेल ५० पैसे प्रतिलिटरने स्वस्त झाले असून, मुंबईत आज पेट्रोल ८७.२१ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७८.८२ रुपये झाले आहे.

गेल्या काही काळापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरु होती. मात्र, दसऱ्यानंतर आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत. गेल्या चार दिवसात दरात १.०९ रुपयांनी तर डिझेल ५० पैशाने स्वस्त झाले आहे.

- Advertisement -

दिल्लीचे पेट्रोल – डिझेलचे दर

आज दिल्लीत पेट्रोल दर २५ पैशांने तर डिझेल दर १७ पैशाने स्वस्त झाले आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोल ८१.७४ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७५.१९ रुपये झाले आहे.

मुंबईचे पेट्रोल डिझेलचे दर

आज मुंबईत पेट्रोल दर ०.२५ पैशांने तर डिझेल दर ०.१८ पैशाने स्वस्त झाले आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल ८७.२१ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७८.८२ रुपये झाले आहे.

- Advertisement -

का झाले इंधन स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दर स्वस्त केले आहे. गेल्या १५ दिवसात कच्च्या तेलाच्या दरात ६ डॉलर प्रति बॅरलने घसरण झाली आहे. यामुळे इंधानाचे दर घसरल्यांचे सांगण्यात येत आहे.

पेट्रोलचे आजचे दर

कोलकत्ता – ८३.५८ रुपये

चेन्नई – ८४.९६ रुपये

डिझेलचे आजचे दर

कोलकत्ता – ७७.०४

चेन्नई – ७९.५१ रुपये


वाचा – पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, आजचा दर काय?

वाचा – पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -