घरट्रेंडिंगPetrol price: 'या' देशात १.४५ रुपये प्रती लीटर दरात मिळतं पेट्रोल

Petrol price: ‘या’ देशात १.४५ रुपये प्रती लीटर दरात मिळतं पेट्रोल

Subscribe

जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळणाऱ्या देशांच्या यादीमध्ये कुवैत पाचव्या क्रमांकावर आहे. कुवैतमध्ये एक लीटर पेट्रोल २५.२६ रुपयांना मिळते.

भारतामध्ये पेट्रोलचे आणि डिझेलचे दर विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. तर भारताच्या शेजारी देशांमध्ये पेट्रोल-डीझेल भारतापेक्षा अर्धा किंमतीत विकलं जात आहे. तर एका देशात चक्क १ रुपया ४५ पैसे दराने पेट्रोल एक लीटर पेट्रोल मिळत आहेत. सर्वांत महागडं पेट्रोल मिळणाऱ्या देशांच्या यादीमध्ये सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक दुसऱ्या स्थानी असून येथे पेट्रोल १४८.०८ रुपये प्रती लीटर दराने पेट्रोल मिळते.जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळणाऱ्या देशांच्या यादीमध्ये कुवैत पाचव्या क्रमांकावर आहे. कुवैतमध्ये एक लीटर पेट्रोल २५.२६ रुपयांना मिळते.

जगात कुठे आणि किती दराने मिळते पेट्रोल 

दिल्ली      ९० रुपये
राजस्थान     १०० रुपये १३ पैसे
पाकिस्तान   ५१.१४ रुपये
श्रीलंका       ६०.२६ रुपये
बांगला        ७६.४१ रुपये

- Advertisement -

त्याचप्रणाणे नेपाळ मध्ये ६८.९८ रुपये, भूतानमध्ये ४९.५६ रुपये,हॉंककॉंग १७४.३८ रुपये,नेदरलॅंड १४७.३८ रुपये,नॉर्वे     १४३.४१ रुपये तर ग्रीसमध्ये १३५.६१ रुपये आहेत. त्याचप्रमाणे कुवैतमध्ये २५.२६ रुपये,अल्जेरिया २५ रुपये, अंगोला १७.८२ रुपये तर इराणमध्ये ५ रुपये, व्हेनेझुएला १ रुपये ४५ पैसे इतके आहेत. भारतामध्ये फेब्रुवारी महिन्यात तब्बल ११ वेळा पेट्रोल डीझेलचे भाव वाढले आहेत. जानेवारीमध्ये १० वेळा इंधन दरवाढ झाली होती.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या वाढीदरम्यान दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील एका पेट्रोल पंप मालकानं ग्राहकांसाठी पेट्रोल मोफत देण्याची एक जबरदस्त ऑफर ठेवली आहे. त्यासाठी ग्राहकांच्या मुलांना श्लोक पाठांतर करणे गरजेचे ठरणार आहे. ही ऑफर पहिली ते अकरावी इयत्तेतील मुलांसाठी आहे.तिरुक्कुरलचे २० श्लोक येत असतील तर १ लीटर पेट्रोल मोफत दिलं जाईल आणि १० श्लोक येत असतील तर अर्धा लीटर पेट्रोल मोफत दिलं जाईल. अनोखी कल्पना या पेट्रोल पंपचे मालक आणि वल्लुवर कॉलेज ऑफ सायन्स अँड मॅनजमेंजच्या अध्यक्षा के सेनगुट्टुवन यांची आहे. दरम्यान मुलांचा तिरुक्कुरल वाचण्यासाठी आणि श्लोक पाठांतरासाठी प्रवृत्त करण्यासाठी ही ऑफर ठेवण्यात आली. गुरुवारी या स्पर्धेमध्ये १४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

 

- Advertisement -

हेही वाचा – पेट्रोलच्या किंमतींनी पूर्ण केली शतकीची हौस, नेटकऱ्यांनी पाडला सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -