पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र चौथ्या दिवशी सुरुच

आज मुंबईमध्ये पेट्रोल ४८ पैशाने वाढले असून डिझेल ५९ पैशाने वाढले आहे. मुंबईत आज पेट्रोल ७५.३९ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ६६.६६ रुपये झाले आहे.

Diesel Price hike 35 paisa hike
Petrol Diesel Price: पेट्रोल नंतर डिझेलच्या किंमतीही शंभरीपार, जाणून घ्या आजचे दर

इंधनाचे दर कमी करुन सरकारने जनतेला काहिसा दिलासा दिला होता. मात्र पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. रविवारी चौथ्या दिवशीही दरवाढ झाली आहे. त्यामुळे जनता पुन्हा एकदा त्रस्त झाली आहे. आधी दरवाढ कमी केल्याचे सरकारने जाहीर केले आणि आता पुन्हा दर वाढ सुरु झाल्यामुळे दरवाढ कमी करुन नेमका काय फायदा झाला असा सवाल जनता विचारत आहे.

दिल्लीचे पेट्रोल – डिझेलचे दर

राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलीटर पेट्रोल दर ४९ पैशाने तर डिझेल ५९ पैशाने वाढले पाहायला मिळत आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोल ६९.७५ रुपये प्रतिलिटर रुपये झाले आहे.

मुंबईचे पेट्रोल – डिझेलचे दर

आज मुंबईत पेट्रोल दर देखील ४८ पैशाने तर तर डिझेल ५९ पैशाने वाढलेले पाहायला मिळत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोलसाठी ७५.३९ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ६६.६६ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

यामुळे वाढले दर

नव्या वर्षात पेट्रोल, डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढीमुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्याच्या शेवटी ही दरवाढ थांबली असतानाही भापतातील पेट्रोल – डिझेलच्या किंमतींवरील त्याचा परिणाम कमी झालेला नाही. दरम्यान, लवकरच पेट्रोल – डिझेलच्या किंमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.