घरदेश-विदेशखुशखबर! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त!

खुशखबर! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त!

Subscribe

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असून सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही महिन्यांत महागाईने उचांक गाठला असताना सामान्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असून सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही झाला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत फार घसरण झाली आहे. पेट्रोल २२-२३ पैसे प्रति लीटरने स्वस्त झाले आहे. तर डिझेलचा दरही २१-२१ पैसे प्रति लीटरने घसरून ६४.१० रुपयांवर आले आहेत. कच्च्या तेलाच्या दरात १ डॉलरचीही वाढ झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा शेकडो कोटींचा फटका बसत असतो. गेल्या काही महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या दरात आंतराष्ट्रीय बाजारात उसळी आल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या होत्या.

- Advertisement -

तसेच भारतात ८० टक्के तेल आयात केले जाते. त्यासाठी कोट्यावधी परदेशी चलन खर्ची पडत असते आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो. पेट्रोल डिझेल महागले की वाहतूक महाग होते आणि त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होऊन मोठया प्रमाणावर महागाई वाढते. परंतु, दरांमध्ये घसरण झाल्याने सर्वसामान्य जनतेलाही दिलासा मिळणार आहे. ज्यावेळी अमेरिका आणि इराणमध्ये तणाव निर्माण झाला होता, त्यावेळी त्याचा फटका सगळ्याच देशांना बसला होता. त्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अर्थव्यवस्थेवरही ताण आला होता.

मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर ७७.१८ रुपये तर डिझेल ६७.१३ रुपये प्रति लीटर झाले आहे. दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत ७१.४९ रुपये तर डिझेलची किंमत ६४.१० रुपये झाली आहे. चेन्नईत पेट्रोल ७४.२८ रुपये तर डिझेल ६७.६५ रुपये प्रति लीटर असे दर आहेत. कोलकात्यात पेट्रोल ७४.१६ रुपये तर डिझेल ६६.४३ रुपये प्रति लीटर या दरात मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -