घरदेश-विदेशजयपूरमध्ये पेट्रोल १०९ रुपये लिटर; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, जाणून तुमच्या शहरात काय आहे दर

जयपूरमध्ये पेट्रोल १०९ रुपये लिटर; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, जाणून तुमच्या शहरात काय आहे दर

Subscribe

नवी दिल्लीः जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने जयपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०९ रुपये झाले असून डिझेल शंभरीच्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा महागाईची छळ बसणार आहे.

गेल्या चोवीस तासात कच्चा तेलाच्या किमतीत २ डॉलरने वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोलच्या किमतीत ६८ पैशांनी वाढ झाली आहे. तेथे पेट्रोल प्रति लिटर १०९ रुपये झाले आहे. तर डिझेल २ रुपयांनी वाढले असून ९४.६१ पैसे प्रति लिटर झाले आहे.

- Advertisement -

दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये तर डिझेल ८९.८२ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये तर डिझेल ९४.२४ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये तर डिझेल ९२ रुपये प्रति लिटर झाले आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल ९६.२६ रुपये तर डिझेल ८९.९५ रुपये आहे.

गेल्या २४ तासात कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. प्रति बॅरल ७७.९३ डॉलर झाले आहे. त्यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे.

- Advertisement -

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कधीच स्थिर नसतात. त्यात सातत्याने बदल होत असतो. त्यानुसार तेल कंपन्याही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी जास्त करत असते.

राज्यात कोणत्या शहरात किती दर?
नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -