मॅनेजरची एक चूक पेट्रोल पंपाला पडली महागात, ग्राहकांनी लुटलं १५ रुपयांत पेट्रोल

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ११० रूपयांच्या पुढे गेल्या आहेत. मात्र, मॅनेजरची एक चूक पेट्रोल पंपाला चांगलीच महागात पडली आहे. कारण ११० रूपयांचं पेट्रोल ग्राहकांनी चक्क १५ रूपयात लुटलं आहे. येथील बऱ्याच प्रवाशांनी संधीचा फायदा घेतला आहे.

अमेरिकेतील नॉर्थ कॅलिफोर्निया येथील हे प्रकरण आहे. येथे रँचो कॉर्डोव्हा येथील शेल गॅस स्टेशनचा मॅनेजर जॉन झेसिनाने एक मोठी चूक केली आहे. दशांश चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळे तेथील पेट्रोल ५०१ रूपये प्रति लिटरने विकले जाऊ लागले. विशेष म्हणजे अमेरिकेतील पेट्रोल पंपावर सेल्फ-सर्व्हिसची व्यवस्था आहे. त्यामुळे याला लाभ २०० हून अधिक लोकांनी घेतल्याचे समजले जाते.

या प्रकरणाची सर्व माहिती मॅनेजरने दिली असून पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. मॅनेजर जॉनने आपली चुक कबुल केली आहे. मी स्वत: प्राईस लिस्ट लावली होती. त्यामुळे हा सर्व गोंधळ झाला. माझ्या हातून झालेली चूक मी मान्य करतो, असं स्पष्टीकरण मॅनेजरने यावेळी दिलं. मात्र, तोटा भरून काढण्यासाठी गॅस स्टेशनचा मालक त्याच्यावर गुन्हा दाखल करणार नसल्याचं मॅनेजरने म्हटलं आहे .

दरम्यान, मॅनेजरच्या एक चुकीमुळे पेट्रोल पंपाला चांगलेच नुकसान झाले आहे. ग्राहकांनी आपल्या पेट्रोलची टाकी फुल भरून घेतली आहे. परंतु या सर्व प्रकरणानंतर पेट्रोल पंपाला १२.५ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा : गृहिणींना मोठा धक्का! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ७५० रुपयांची वाढ