Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश EPFO च्या महत्त्वाच्या नियमांत मोठे बदल, कर्मचाऱ्यांनी लवकर अपडेट करा अकाउंट

EPFO च्या महत्त्वाच्या नियमांत मोठे बदल, कर्मचाऱ्यांनी लवकर अपडेट करा अकाउंट

सोप्या स्टेप फॉलो करून आधार लिंक करा

Related Story

- Advertisement -

EPFO खाते असणाऱ्या ६ कोटी खातेदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एका नियमात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे आपण नोकरीस असाल तर हा बदल काळजीपूर्वक समजून घ्या. (Employees’ Provident Fund Organisation) ईपीएफओच्या नवीन नियमांनुसार प्रत्येक खातेधारकांला आता आपले पीएफ खाते Universal account number (UAN) आधार कार्ड (Aadhaar card) शी जोडणे गरजेचे असणार आहे. अन्यथा कंपनीकडून रक्कम खातेधारकाच्या खात्यात जमा होणार नाही. केवळ एकच रक्कम जमा होईल. ती म्हणजे कर्मचाऱ्याचीच असेल. यासाठी EPFO ने Social Security code 2020 मधील सेक्शन १४२ मध्ये मोठा बदल केला आहे. यामुळे Electronic Challan cum Return (ECR) फाइलिंग प्रोटोकॉल देखील बदलला आहे.

UNA नंबर आधारशी लिंक केला नाही केल्यास ECR वेगळा भरावा लागणार

EPFO ने यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली की, १ जून २०२१ नंतर तेच कर्मचारी ECR फाईल करु शकतात ज्यांनी UAN नंबर Aadhaar ला लिंक केला आहे. परंतु ज्यांचा UAN नंबर आधारशी लिंक केला नाही त्यांना ECR वेगळा भरावा लागणार आहे. पण हा ECR कर्मचारीनंतर UAN आणि आधारशी जोडू शकतात. परंतु ही प्रोसेस कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर पूर्ण करावी लागणार आहे.

नियम बदलामुळे काय होणार नुकसान?

- Advertisement -

कर्मचाऱ्यांनी आपले EPFO खाते आधारशी लिंक न केल्यास त्यांना कंपनीकडून येणारे पैसे मिळणार नाहीत. परंतु एकदा तुम्ही PF खाते आधारशी लिंक केल्यास तुमचे कंपनीकडून मिळणारे पैसे सुरु होतील. त्यामुळे अजूनही तुम्ही PF खाते आधारनंबरशी जोडले नसाल तर लवकरात लवकर ते काम पूर्ण करा.

१२ लाख नवे खातेदार

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) द्वारे जाहीर केलेल्या एका रिपोर्टनुसार, मार्च महिन्यात EPFO च्या योजनेत जवळपास १२.२४ लाख नवे खातेदार जोडले गेले आहेत. तर फेब्रुवारीमध्ये ११.७७ लाख नवीन कर्मचारी जोडले गेले, परंतु एकंदरीत अंदाज पाहिल्यास गेल्यावर्षी ESIC योजनेत समावेश होणाऱ्या संख्येत २४ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा मात्र ESIC योजनेशी जोडलेल्या नव्या कर्मचाऱ्यांची संख्या १.१५ कोटी आहे.

कसे कराल आधार कार्ड अपडेट ?

- Advertisement -

कर्मचाऱ्यांचे आधार कार्ड PF खात्याशी जोडण्याची जबाबदारी त्यासंबंधीत कंपनीची असते. EPFO ने देखील यासंदर्भातील अधिसुचना जाहीर केली आहे. त्यामुळे आधार लिंक न झा्ल्यास कर्मचाऱ्य़ांच्या पीएफ खात्यात ती रक्कम दाखवली जाईल जी त्यांच्या पगार आणि महागाई भत्त्यातून येते.

सोप्या स्टेप फॉलो करून आधार लिंक करा

१) PF खाते आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सर्वप्रथम epfindia.gov.in वेबसाईटवर जा.

२) ऑनलाईन सर्विसेजमधील ई-केवायसी पोर्टलवर क्लिक करा.

३) आता आधार नंबर आणि मोबाईल नंबर भरा, त्यानंतर एक ओटीपी येईल.

४) आता पुन्हा आधारनंबर भरावा लागेल, त्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन लिहिले दिसेल तिथे क्लिक करा.

५) असे तीन वेळा आधारनंबर , ओटीपी, आणि मोबाईल नंबर भरल्यानंतरच तुमचे पीएफ अकाउंट आधारशी लिंक होईल.


Mumbai heavy rain : मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणांना सतर्कतेचे आदेश


 

- Advertisement -