घरCORONA UPDATEफायझर लस भारतात वापरण्यासाठी कंपनीची DCGIकडे मागणी

फायझर लस भारतात वापरण्यासाठी कंपनीची DCGIकडे मागणी

Subscribe

या लसीला ब्रिटन आणि बहरीनमध्ये मंजूरी मिळाल्यानंतर भारतानाही ही लस आपत्कालीन परिस्थित वापरण्यात यावी यासाठी फायझर कंपनीने मागणी केली आहे.

भारतातील कोरोना लसीचे उत्पादन अंतिम टप्प्यात आले आहे. तर एकीकडे फायझर बायोटेक कंपनीही भारतात कोरोना लसी आणण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या फायझर कंपनीने तयार केलेली कोरोना लसीला ब्रिटेनमध्ये मंजूरी देण्यात आली आहे. ही लस आपतकालीन परिस्थितीमध्ये वापरण्यासाठी कंपनीने DCGI ( Drugs Controller General of India ) कडे परवानगी मागितली आहे. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी कंपनीकडून मंजुरी अर्ज करण्यात आला आहे. या लसीला ब्रिटन आणि बहरीनमध्ये मंजूरी मिळाल्यानंतर भारतानाही ही लस आपत्कालीन परिस्थित वापरण्यात यावी यासाठी फायझर कंपनीने मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी फायझर या औषध बनवणाऱ्या कंपनीने कोरोना लसीच्या मंजुरीसाठी DGCI कडे अर्ज पाठवला आहे. यात त्यांनी कोरोना लसीच्या आयातीसाठी मान्यता देऊन ही लस जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवता यावी असे म्हटले आहे. त्याचबरोबर ब्रिटन आणि बहरेनमध्ये कोरोना लसीच्या वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे त्यामुळे आता ती लस भारतीयांपर्यंतही पोहचवायची आहे, असे फायझर कंपनीने म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोना वरील लस तयार करणाऱ्या फायझर कंपनीला ही लस भारतात विकायची आहे. त्याचबरोबर त्याची भारतीयांवर क्लिनिकल चाचणी ही करायची आहे. त्यामुळे फायझर बायोटेक कंपनीने आणि क्लिनिकल चाचणी नियम २०१९च्या अंतर्गत भारतीयांवर कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्या करण्यासाठी परवानगी मागितली आहे. ब्रिटनमध्ये फायझरच्या कोरोना लसीला आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. पुढील आठवड्यात ब्रिटनमधील लोकांनी ही लस देण्यात येणार आहे.


हेही वाचा – विनामास्क फिरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये पाठवा – उच्च न्यायालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -