घरदेश-विदेशPfizer, BioNtech कडून १२ वर्षांखालील मुलांवर कोरोना लसीचं ट्रायल सुरू

Pfizer, BioNtech कडून १२ वर्षांखालील मुलांवर कोरोना लसीचं ट्रायल सुरू

Subscribe

२०२२ या वर्षाच्या सुरूवातीला १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना होणार कोरोना लस उपलब्ध ?

Pfizer Inc आणि जर्मन भागीदार BioNtech SE या कंपन्यांनी १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी त्यांच्या कोरोना लसची चाचणी सुरू केली असल्याची माहिती अमेरिकेतील औषध निर्माता कंपनी Pfizer ने गुरूवारी माहिती दिली आहे. कंपनीने घेतलेल्या निर्णयानंतर अपेक्षा वाढली असून २०२२ या वर्षाच्या सुरूवातीला १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोरोना लस उपलब्ध करण्यात येईल, अशी शक्यता नाकारता येत नाही. जागतिक कोरोना लसीकरण मोहिमेमधील पुढच्या टप्प्याची ही सुरूवात असल्याचे म्हटले जात असून फायझरने आपली सहकारी कंपनी असलेल्या बायोएनटेकच्या सहकार्याने ही कोरोना चाचणी सुरू केली आहे, अशी माहिती AFP या वृत्तसंस्थेने दिली आहे.

फायझरच्या एका प्रवक्ता Sharon Castillo याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी स्वयंसेवकांच्या पहिल्या बॅचला सुरूवातीच्या टप्प्यादरम्यान कोरोना लसीच्या ट्रायल अंतर्गत कोरोनाची लस देण्यात आली. यासह आमची सहकारी कंपनी असणाऱ्या बायोएनटेकच्या सहाय्याने आम्ही फायझर-बायोएनटेक कोरोना लसीची सुरक्षा, सहनशीलता आणि रोगप्रतिकारकशक्तीची चाचणी करण्यासाठी जागतिक मोहिमेअंतर्गत अभ्यासादरम्यान निरोगी मुलांना लस देण्यात आली, असे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

- Advertisement -

फायझर-बायोएनटेक कंपनीची लस अमेरिकेच्या नियामकांनी डिसेंबरमध्ये १६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी वापरण्यास मान्यता दिली होती. आतापर्यंत या लसीचे ६.६ कोटी डोस संपूर्ण अमेरिकेत देण्यात आले असल्याची आकडेवारी अमेरिकन सेंटर फॉर डिसिसीज एंड प्रिव्हेंशनने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फायझरच्या कोरोना लसीची ही चाचणी १२ वर्षांपेक्षा कमी व ६ महिन्यांपर्यंतच्या मुलांवर केली जात आहे. गेल्या आठवड्यातही मॉडर्ना इंककडून अशाप्रकारची चाचणी सुरू करण्यात आली होती.

तसेच अमेरिकेत १६ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी केवळ Pfizer/BioNTech लस वापरल्या जात आहेत तर १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी Moderna ची लस वापरली जात आहेत. आतापर्यंत अमेरिकेत मुलांसाठी कोणत्याही कोरोना लसीला मंजूरी देण्यात आलेली नाही. यासह कंपनीने यापूर्वीच १२ ते १५ वयवर्ष असणाऱ्या मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, अमेरिकेत आप्तकालीन प्राधिकारणाने १६ वर्ष व त्याहून अधिक असणाऱ्या लोकांना लसीकरणाची मान्यता दिली आहे. तर फायझर, मॉडर्ना, एस्ट्रोजेनेकाने लहान मुलांवर कोरोना लसीच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. यासह सध्या जॉन्सस अॅण्ड जॉन्सस लहान मुलांना देण्यात येतील अशी लसीवर संशोधनाचं काम करत आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -