घरCORONA UPDATECorona Vaccine : कोरोना लस कंपन्या मालामाल, Pfizer, Moderna, BioNTech ची प्रति...

Corona Vaccine : कोरोना लस कंपन्या मालामाल, Pfizer, Moderna, BioNTech ची प्रति सेकंदाला १ हजार डॉलरची कमाई

Subscribe

जगात कोरोना विषाणूने कहर केला असताना कोरोनाविरोधी लसींमुळे हा संसर्ग रोखण्यात मोठे यश आले. त्यामुळे कोरोनाविरोधात आता लस हाच एकमेव उपाय असल्याचे सध्यातरी म्हटले जातेय. यामुळे जगभरातील नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या या लसींमुळे लस निर्मिती कंपन्या मालामाल होत आहे. लसींची निमिर्ती करणाऱ्या विदेशी कंपन्यांचा नफा प्रति सेकंदाला वाढतोय. नेमकं या लसी निर्मिती करणाऱ्या कंपन्या यातून किती कमाई करताय ते आपण जाणून घेऊ…

जगभरात मागील वर्षी जानेवारीपासून देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार सुरु झाला. यामध्ये सुरुवातीला चीननंतर युरोप, अमेरिका, मध्य आशिया तसेच पुढे रशिया आणि भारतात प्रसार वाढतचं गेला, सुरुवातील धोका जाणवला नाही, मात्र मार्चपासून कोरोनाने जो थैमान मांडला यात अनेकांचे प्राण गेले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू झाले. जगभरातील अनेक देशांमध्ये हीच स्थिती होती. अशातच भविष्यात येणारी लाट रोखणे आरोग्य यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. यामुळे अनेक देशांमध्ये लस निर्मितीवर भर दिला जात आहे. यातून सर्वांधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहेत. एकीकडे सर्व देशांकडून लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. तर दुसरीकडे या लसींच्या निर्मितीतून अनेक कंपन्या एक सेकंदाला लाखोंची कमाई करुन जात आहेत. यामुळे लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा नफा प्रति सेकंदाला भर पडतेय.

- Advertisement -

या फायझर, मॉडर्ना, बायोएनटेकची या तीन कंपन्यांचा एकत्रित नफा एक मिनिटाला ६५ हजार डॉलर म्हणजेच प्रति संकदाला या कंपन्या १ हजार डॉलरपेक्षा जास्त नफा कमावतायत. याचे भारतीय मूल्य ७४ हजार रुपये इतके आहे.

आफ्रिकन देशामध्ये काम करणाऱ्या ‘पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स’ या संस्थेने याबाबतचा अहवाल तयार केलाय. कोरोनाविरोधी लस उत्पादक कंपन्यांच्या वार्षिक अहवालावर हा अहवाल तयार केलाय. आफ्रिकन देशांमध्ये सध्या ही संस्था काम करतेय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्व देशांना लसींची गरज आहे. मात्र मात्र फायझर, मॉडेर्ना आणि बायोएनटेक या तीन कंपन्यांनी जादा नफा कमविण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्ससारख्या श्रीमंत देशांनाच लस पुरवठा केला असंही या अहवालात नमूद केलंय. या तीन कंपन्यांचा एकत्रित नफा प्रति सेकंद एक हजार डॉलर्स तर प्रति दिवसाला ९ कोटी ३५ लाख डॉलर्स इतका आहे. विशेष म्हणजे सीरम कंपनीच्या उत्पन्नातही विक्रमी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदार पूनावाला यांचे नाव घेतले जाते.

- Advertisement -

मात्र यामागे देखील एक नकारात्मक बाजू समोर आली आहे. ती म्हणजे फायझर, बायोइनटेक कंपन्यांनी गरीब देशांना एकूण पुरवठ्यांपैकी केवळ एक टक्क्यांपेक्षा कमी पुरवठा केला आहे. तर मॉर्डना कंपनीने फक्त ०.२ टक्के पुरवठा केला आहे. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या देशांतील जवळपास ९८ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. मात्र अॅस्ट्रोझेनका आणि जॉन्सन कंपनी यापूर्णपणे विरोधी भूमिकेत आहे. या कंपन्या ना -नफा ना तोटा या तत्वावर लस वितरण करत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -